खैरे अन् दानवेंच्या वादाचा फटका; छत्रपती संभाजीनगरची महापालिका ठाकरेंच्या हातून निसटली

अंबादास दानवे आणि शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकात खैरे यांचा वाद महानगरपालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर उफाळून आला होता.

  • Written By: Published:
News Photo   2026 01 17T151552.942

छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेना पक्षाची मजबूत पकड होती. (Sambhajinagar) ही पकड 2022 ला शिवसेनेत दिर्घकाळापासून कार्यकर्ता ते मंत्री पदापर्यंत काम करणारे एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन बंड केलं त्यानंतर डिली होत गेली. पक्षात बंड झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या फळीत काम करणारे कार्यकर्ते एकमदच चर्चेत आले. अशाच दुसऱ्या फळीत काम करणारे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे हे चर्चेत आले. ते फक्त चर्चेतच नाही तर राज्यात विधान परिषदेत विरोधी पक्षनेते झाले. ज्या अंबादास दानवे यांना फक्त संभाजीनगर जिल्ह्यापुरतीच ओळख होती ते अचानक राज्याच्या राजकीय पटलावर आले.

आता याच दानवे आणि शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकात खैरे यांचा वाद महानगरपालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर पुन्हा एकदा उफाळून आला होता तो ‘मी दानवेला सरळ करेल’ असं खैरे म्हणण्यापर्यंत गेला. परंतु, हा वाद फक्त दोघांमध्येच न राहता तो पक्षाचं यश उपयशात घेऊन जाणाराही ठरला. एकेकाळी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत एकहाती सत्ता असणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला अवघ्या 6 जागा मिळाल्या आहेत. हे फक्त खैरे-दानवे वादामुळेच झालयं असंही नाही, त्याला पक्षाचे दोन शकलं होणही तितकच कारणीभूत आहे. परंतु, अशा पडतीच्या काळातही स्थानिक पातळीवर पक्षातील दोन महत्वांच्या नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही हे पक्षासाठी अडचणीचंच ठरतय हे पुन्हा एकदा या निवडणुकीत पाहायला मिळालं.

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन्ही शिवसेनेची धूळधाण, भाजपचे अतुल सावे कसे ठरले जायंट किलर

महानगरपालिकेत इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतील फक्त दानवे यांनीच घेतल्या. उमेदवार निश्चित फक्त दानवे यांनीच केले. आपल्या मर्जीने उमेदवारी फक्त दानवे यांनीच दिली. यामध्ये कुठही आपल्याला सहभागी करून घेतलं नाही असा थेट आरोप नेते खैरे यांनी केला आहे. त्याचबरोबर माजी महापौर अब्दुल रशिद खान उर्फ मामू यांना उमेदवारी देण्यावरूनही मोठा वाद या दोघांमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं. हा मामू पक्षातच नको म्हणणाऱ्या खैरे यांना डावलून दानवे यांनी त्यांना पक्षात घेतलही आणि त्यांना उमेदवारीही दिली. ते या विजयी सहा उमेदवारांमध्ये आहेत. परंतु, त्यांना पक्षात घेतल्याने आपलं नुकसान होईल असं म्हणत असणाऱ्या खैरेंना दानवेंनी दूर ठेवलं हेही इथ लक्षात घेतलं पाहिजे.

या दोघांचा वाद वारंवार सुरुच असतो. काही दिवसांपूर्वी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर अंबादास दानवे यांनी भेट घडवून आणली. ते पक्षात प्रवेश करणार अशाही चर्चा सुरू झाल्या. यालाही चंद्रकांत खैरे यांनी कडाडून विरोध केला. 2019 ला खैरे शिवसेनेकडून, इम्तियाज जलील एमआयएमकडून आणि हर्षवर्धन जाधव अपक्ष उभे राहिले. त्यामध्ये दोन लाखापेक्षा जास्त मत जाधव यांनी घेतले आणि खैरे यांचा अवघ्या तीन हजार मतांनी पराभव झाला. तो पराभव खैरे यांच्या जिव्हारी लागला. त्याच काळात हर्षवर्धन जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होत. त्याचाही आधार खैर यांनी घेत त्यांच्या प्रवेशाला विरोध दर्शवला आहे. दरम्यान, या सगळ्या वादाची किनार असतानाच महानगरपालिका निवडणूक झाली. त्यामध्ये खैरे यांना साईडलाईन करण्यात आलं. दानवे यांनी आपल्या मर्जीने सगळा कारभार हाकला आणि शेवटी दिर्घकाळ सत्ता असलेल्या शहरात 97 जागा लढून फक्त 6 जागा मिळाल्या असा हा खैरे आणि दानवे वादाच्या अंक आहे.

follow us