नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांबरोबरच वापर करणाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा; औरंगाबाद खंडपीठ

नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांबरोबरच वापर करणाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा; औरंगाबाद खंडपीठ

Criminal Charges Filed Against Who Sell And Use Nylon Nets : मागील काही दिवसापासून अहमदनगर महानगरपालिका (Ahmednagar News) हद्दीत आणि जिल्ह्यात काही ठिकाणी हसन आणि पोलिसांनी नायलॉन मांजा (Nylon Manja) वापरणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केलीय. त्याबद्दल अण्णा हजारे यांचे सहकारी आणि शहरातील वकिल श्याम आसावा यांनी प्रशासनाचं मनपूर्वक अभिनंदन केलंय.

“मला शिंदेंनी आरोग्य विभागाची ऑफर दिली होती पण..”, शिवसेना मंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट

प्लॅस्टिक किंवा इतर कृत्रिम वस्तूपासून बनविलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या धाग्यामुळे पक्षांना तसेच मानवी जिवितांस तीव्र इजा होण्याचा धोका असतो. हे कापलेले धागे पतंगांसोबत जमिनीवरच राहतात. ते जैवविघटनशील नसल्यामुळे मातीमध्ये मिसळतात. गटारे अडवणे, ड्रेनेज लाइन, नद्या, नाले यांसारखे नैसर्गिक पाण्याचे मार्ग, माती यावर विपरीत परिणाम (Shyam Aasava News) होतात. पडलेले धागे कापून पडल्यामुळे गुरेढोरे, गायी आणि इतर प्राणी नायलॉनसह अन्नपदार्थ खातात. त्यामुळे राज्य सरकारने 1986 च्या पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम 5 नुसार या मांजाची विक्री आणि वापरावर कायमस्वरुपी बंदी घातली आहे.

“मला शिंदेंनी आरोग्य विभागाची ऑफर दिली होती पण..”, शिवसेना मंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट

केवळ दंडात्मक कारवाई केल्याने घातक मांजा विक्री आणि वापर करणाऱ्यांवर जरब बसत नाही. त्यामुळे संबंधितांवर इतरांच्या जीवित आज लोका निर्माण केल्याने आणि पर्यावरणाचे नुकसान केल्याबाबत फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घातक नायलॉन मांजा विक्री करताना आढळून आलेल्या आरोपींवर आता मोक्का तसंच तडीपार अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी याप्रकरणी दोन जणांवर तशी कारवाई सुरू केलीय. याप्रमाणे आपल्या जिल्ह्यात कारवाई होणे आवश्यक असल्याचं श्याम आसावा यांनी म्हटलंय.

खंडपीठाचा महत्त्वपूर्ण आदेश :

या प्रकरणी मांजा सापडेल ते ठिकाण सील करावं. अल्पवयीन मुलांकडे नायलॉन मांजा कुठून आणला याची माहिती लपवली तर पालकांवरही गुन्हा दाखल करावा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठानं (Aurangabad Bench) दिले आहेत. त्यानुसार ज्या ठिकाणी मांजाची विक्री आणि साठवणूक सापडेल त्यांच्यावर केवळ दंडात्मक कारवाया न करता ते ठिकाण सील करण्यात यावी. मांजाचा वापर करणाऱ्यांवर आणि वापर करणारे जर अल्पवयीन असतील, तर त्यांच्या पालकांवर कारवाई होणे सुद्धा गरजेचे आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या