संदीप लोणकर यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रभाग क्रमांक १५ मध्ये शिवसेनेचा धडाका
उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून गाव विकासाचे नियोजन करण्याची जाण शिवसेनेच्या सर्व उमेदवारांमध्ये आहे.
“प्रभाग क्रमांक १५ हा नव्याने समाविष्ट गावांचा मोठा प्रभाग आहे. (Pune) पाणी, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण, वीज आणि सामाजिक सुरक्षितता हे येथील महत्त्वाचे प्रश्न आहेत. उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून गाव विकासाचे नियोजन करण्याची जाण शिवसेनेच्या सर्व उमेदवारांमध्ये आहे. मात्र, त्यांना महापालिकेत पाठवण्याची जबाबदारी मतदारांनी घ्यावी,” असे आवाहन केल्यानंतर नागरिकांनी शिवसेना शिवसेना असा जयघोष केला आहे.
मांजरी बुद्रुक-केशवनगर-साडेसतरानळी-शेवाळवाडी (क्रमांक १५) या प्रभागातील शिवसेनेचे उमेदवार संदीप लोणकर यांच्या प्रचारार्थ महादेवनगर मांजरी रस्त्यावरील घुले वस्ती, गोपाळपट्टी, ढेरे बंगला, दरडी, रेल्वे गेट परिसरात पदयात्रा काढण्यात आली. या वेळी नागरिकांनी असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रचाराच्या अतिशय कमी कालावधीत देखील अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठीच मतदारांची घरोघरी जाऊन भेट घेतली जात आहे.
या वेळी पदाधिकारी विशाल ढोरे, अमर घुले, सुधीर घुले, विकी माने, सागर घुले, अमोल मोरे, कुणाल मोरे, विजय कामठे, अक्षय तारू, दीपक कुलाळ, पंकज पवार, निळकंठ आण्णा, तेजस गायकवाड, आनंद मोरे, शैलेंद्र शेलार, चेतन जाधव, आरिफ पटेल, शंतनू सरकार, श्रीधर अडकुटे, तुषार मरळ, निकिता गायकवाड, गौरीशंकर घुले, देविदास जगताप, समीर मोरे, अनिकेत गोरे, विक्रांत होरटे, विशाल करके, सुमित बोबडे, विशाल सूर्यवंशी, विजय कदम
यांच्यासह साहिल भंडारी, ओम कांबळे, जयराम राजपूत, मल्लेश चलवादी, प्रशांत भंडारी, ज्योती गागडे, कांता हाके, मंगला शिनलकर, निशिगंधा थोरात, दीपक माने, दीपक गायकवाड, छाया गदादे, योगीराज इंगळे, अशोक ढमढेरे, दिलीप लोणकर, रायबा गायकवाड, रामदास चांदगुडे, दत्तात्रय भंडारी आदींसह लाडक्या बहिणी व कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते.
