Video : आमदार योगेश टिळेकरांमुळे माझी उमेदवारी कापली; संदीप लोणकर यांचा थेट आरोप
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांना सगळे प्रश्न माहिती आहेत. आमचे जे काही रखडलेले काम आहेत ते आम्ही लवकरच पूर्ण करणार आहोत.
पुण्यातील प्रभाग क्रमांक 15 मधून संदीप लोणकर हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. (Pune) हा भाग नव्याने म्हणजे 2017 ला महानगरपालिकेत समावेश झाला आहे. लोणकर हे काही काळ सरपंच राहीलेले आहेत. माझ्या भागात मी विकास करण्यासाठी कायम कार्यरत असतो. माझ्या कामाची दखल लोक घेतील असं मत लोणकर यांनी मांडलं.ते लेट्सअपवर बोलत होते.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांना सगळे प्रश्न माहिती आहेत. आमचे जे काही रखडलेले काम आहेत ते आम्ही लवकरच पूर्ण करणार आहोत. आमचा भाग नव्याने महानगरपालिकेत समाविष्ट झाल्याने अनेक कामं बाकी आहेत. ते कामं कसे लवकर करता येतील याचा प्रयत्न करणात आहोत. गेली 32 वर्षापासून आमच्या भागातील रस्ता झालेला नाही असंही ते यावेळी म्हणाले.
आज पाहिलं तर एक एक तास ट्रॉफीक जाम होतो. अनेकांना आपला वेळ वाया घालवावा लागतो. मात्र, आम्हाला मतदारांनी संधी दिली तर मी निवडून आल्याच्यानंतर सहा महिन्याच्या आत काम मार्गी लावणार आहे. कारण, मी कायम काम करत आलो आहे. त्यामुळे आताही हे काम करण्यासाठी मी वेळ लावणार नाही. कारण, आजपर्यंत जे लोक राज्यकर्ते आहेत त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे असंही ते म्हणाले.
आज माझी पुण्यात भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. मला अनेक पक्षाचे, नेत्यांनी अमिष देण्यात आले. परंतु, ते मी फेटाळले. कारण मला पक्ष आणि काम महत्वाचं आहे असंही ते म्हणाले.अनेक सर्वे झाले. त्यामध्ये भाजप पक्ष म्हणून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सर्वे झाले. त्यामध्ये माझं नावंही आलं. परंतु, शेवटच्या क्षणी मला डावलण्यात आलं. पक्षातील आमदार योगेश टिळेकर यांनी माझी उमेदवारी नाकारली असा थेट आरोपही लोणकर यांनी केला.
माझी भाजपने उमेदवारी कापली तेव्हा माझ्या परिसरातील लोकांमध्ये मोठा संताप उसळून आला. कारण लोकांना माहिती होत मला उमेदवारी मिळेल. परंतु, टिळेकर यांनी मला उमेदवारी मिळू नये यासाठी कटकारस्थान केलं. उमेदवारी नाकारली आणि माझा येथे घात केला. परंतु, मी आजही संघाचा कार्यकर्ता आहे. मी हिंदुत्ववादी आहे आणि लोक मला विजयी करुन यांना यांची जागा दाखवतील असंही लोणकर यावेळी म्हणाले.
