Video : पुणे महानगरपालिकेतील राज्यकर्त्यांनी प्र. क्र. 15 कडं दुर्लक्ष केलं, काय म्हणाले शिंदेंचे उमेदवार लोणकर

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्तात आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. नगरविकास खातही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ते आम्हाला चांगली ताकत देतील.

News Photo   2026 01 06T153820.886

पुण्यातील प्रभाग क्रमांक 15 मधून संदीप लोणकर हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. (Pune) हा भाग 2017 ला नव्याने  महानगरपालिकेत समावेश झाला. 2021 ला मांजरी आणि शेवाळे वाडी यांचाही सहभाग झाला. हा प्रभाग नवीन भागांनी तयार झालेला आहे. 2017 पासून आजपर्यंत या भागात महानगरपालिकेत जे राज्यकर्ते होते त्यांच्याकडून काही काम झाले नाहीत, ते आम्ही करणार आहोत असं मत लोणकर यांनी मांडलं आहे. ते लेट्सअपवर बोलत होते.

या भागात आजही मुलभूत सुविधा नाहीत. पाण्यापासून ड्रेनेजपासून वीज असे सगळे प्रश्न प्रलंबीत आहेत. तसंच, महानगरपालिका म्हणून त्यांच्या ज्या काही सुविधा असतात त्या सुविधा आजही मिळत नाहीत. त्यामुळे या भागातील अनेक लोकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आज अनेक लोकांमध्ये मोठा आक्रोश आहे. त्यामुळे आम्ही ही निवडणूक ताकतीने लढवत आहोत.

पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक २५ मध्ये श्रृती वाकडकर यांच्या प्रचाराचा आज नारळ फुटणार

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्तात आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. नगरविकास खातही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ते आम्हाला चांगली ताकत देतील. येणाऱ्या काळात या भागात जे काही प्रश्न शिल्लक आहेत त्या प्रश्नांवर शिंदे यांचं लक्ष असल्याने हे सर्व प्रश्न सुटलेले असतील असंही लोणकर यावेळी म्हणाले. तसंच, आमचं पॅनलही तगडं आहे असंही ते म्हणाले.

जवळपास गेली 20 वर्षापासून मी राजकारणात आहे. केशवनगर इथला मी उपसरपंच आणि सरपंचही होतो. तसंच, मी पुढे भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामध्ये मी पणे शहराचा युवा मोर्चाचा उपाध्यक्ष, हडपसर मतदारसंघाचा उपाध्यक्ष म्हणूनही काम केलं आणि आता या मतदार संघाचा मी अध्यक्ष आहे. तर या काळात मी या शरहाचा किंवा भागाचा जेव्हडा करता येईल तेव्हडा विकास केला असंही लोणकर म्हणाले.

follow us