उपरस्ते अन् बरच काही… श्रुती वाकडकरांनी सांगितलं प्रभाग क्रमांक 25 साठीचं व्हिजन

Shruti Wakadkar यांना पिंपरी चिचवडच्या प्रभाग क्रमांक 25साठी भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यांनी त्यांचं प्रभाग क्र 25 साठीचं व्हिजन सांगितलं.

Shruti Wakadkar

Pimpri Chinchvad Ward 25 BJP Candidate Shruti Wakadkar Vision : राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने आपली सत्ता आणण्यासाठी कंबर कसलेली आहे. त्यामध्ये पिंपरी चिचवडच्या प्रभाग क्रमांक 25साठी भाजपने श्रुती वाकडकर यांना उमेदवारी दिली आहे. या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने वाकडकर यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांनी त्यांचं प्रभाग क्रमांक 25 साठीचं व्हिजन सांगितलं आहे.

वाकडकरांचं प्रभाग क्रमांक 25 साठीचं व्हिजन

यावेळी बोलताना वाकडकर म्हणाल्या की, पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. हा प्रभाग क्रमांक 25 म्हणजे वाकड ताथवडे आणि पुनावळे हा माझ्यासाठी माझा परिवार आहे. त्यामुळे माझ्या या कुटुंबाचा विकास करणे हे माझं ध्येय आहे.

पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक २५ मध्ये श्रृती वाकडकर यांच्या प्रचाराचा आज नारळ फुटणार

या प्रभागामध्ये पाणी,रस्ते, ट्रॅफिक आणि महिला सुरक्षितता यासाठी मी रस्त्यांच्याबाबतीत सांगायचं झालं तर इथे प्रत्येक रस्त्यांना उपरस्ता हवा आहे. यासाठी माझे पती राम वाकडकर यांनी केंद्रिय परिवहन आणि रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. त्याचा आणखी पाठपुरावा करणार असल्याचं यावेळी श्रुती यांनी म्हटलं आहे.

विकासकामांमुळे नागरिकांच्या मनात युतीबद्दल शाश्वत वातावरण निर्माण झाले : आमदार संग्राम जगताप

दरम्यान पिंपरी चिंचवडमधील बहुचर्चित प्रभाग क्रमांक 25 मधील भाजप प्रचाराचा नारळ आज फुटणार, राहुल कलाटे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पॅनलचा प्रचार पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक 25 (वाकड, ताथवडे, पुनावळे) मधील भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ पुनावळे गावठाणात होत आहे. यावेळी प्रभागातील भाजप उमेदवार माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्यासह इतर उमेदवार उपस्थित असतील. पुनावळे गावठाणातून प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर याच भागातून पदयात्राही काढण्यात येणार आहे.

 

follow us