कंटेंट इंडिया 2026 मध्ये देश-विदेशातील दिग्गज राहणार उपस्थित
Content India 2026-16 ते १८ मार्च 2026 दरम्यान मुंबईतील Taj Lands End येथे हा तीन दिवसीय कार्यक्रम होणार आहे.
Content India 2026 : भारताच्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राची जागतिक स्तरावर वेगाने वाढ होत आहे. ओटीटीचा वाढता वापर, प्रादेशिक कंटेंटची वाढ आणि परदेशी सहकार्यामुळे उद्योगाला नवी चालना मिळत आहे. या पार्श्वभूमीवर Content India 2026 मध्ये देश-विदेशातून मीडिया क्षेत्रातील अतिथी एकत्र येणार आहेत. 16 ते १८ मार्च 2026 दरम्यान मुंबईतील Taj Lands End येथे हा तीन दिवसीय कार्यक्रम होणार आहे. Dish TV आणि C21Media यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मंचावर ब्रॉडकास्टर्स, ओटीटी प्लॅटफॉर्म्स, फिल्म स्टुडिओ, निर्माते, वितरक आणि गुंतवणूकदार सहभागी होणार आहेत.
या मंचावर कंटेंट निर्मितीतील नवे ट्रेंड, बदलते व्यवसाय मॉडेल, गुंतवणुकीच्या संधी आणि तांत्रिक नवकल्पना यावर चर्चा होईल. नेटवर्किंग, पॅनल चर्चासत्रे आणि खास बैठकींतून नवे सहकार्य आणि करार घडवण्यावर भर दिला जाणार आहे. भारत जागतिक कंटेंट बाजारात मोठी भूमिका बजावत असताना, Content India 2026 हा उद्योगाच्या पुढील टप्प्याला दिशा देणारा महत्त्वाचा मंच ठरणार आहे.
आमंत्रित वक्त्यांमध्ये केविन वाझ (मुख्य कार्यकारी अधिकारी –एंटरटेनमेंट, जिओस्टार), अर्जुन नोहर (व्यवस्थापकीय संचालक – भारत व दक्षिण आशिया, वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी), मुकुंद गलगली (उपमुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य वित्त अधिकारी, झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस), आशिष सहगल (मुख्य कार्यकारी अधिकारी, टाइम्स नेटवर्क), शिलांगी मुखर्जी (संचालक व एसव्हीओडी व्यवसाय प्रमुख, प्राइम व्हिडिओ), नितीन बर्मन (मुख्य महसूल अधिकारी, बालाजी टेलिफिल्म्स), दीपक धर (संस्थापक व समूह मुख्य कार्यकारी अधिकारी, बॅनिजे एशिया), अराधना भोला (व्यवस्थापकीय संचालक – भारत, फ्रिमँटल), दीपक सेगल (मुख्य सर्जनशील अधिकारी, अप्लॉज एंटरटेनमेंट), फिओना कॅम्पबेल (अंतरिम संचालक – अनस्क्रिप्टेड टीव्ही, बीबीसी कंटेंट), फ्रँक स्पॉटनिट्झ (मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक, बिग लाईट प्रॉडक्शन्स), स्टीव्ह मॅथ्यूज (स्क्रिप्टेड क्रिएटिव्ह प्रमुख, बॅनिजे एंटरटेनमेंट) आणि कल्पना मालवीय (संस्थापक, रेअरिफाइड स्टुडिओज) यांचा समावेश आहे. पुढील काही आठवड्यांत आणखी वक्त्यांची नावे आणि कार्यक्रमाचे तपशील जाहीर केले जाणार आहेत.
या व्यासपीठाच्या वाढीबद्दल बोलताना डिश टीव्ही इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक मनोज डोभाल म्हणाले की , “कंटेंट इंडियाची संकल्पना उद्योगातील निर्णय घेणाऱ्या व्यक्तींना एकत्र आणण्यासाठी करण्यात आली. २०२६ मध्ये तीन दिवसांच्या विस्तारित स्वरूपात आम्ही अर्थपूर्ण चर्चा, धोरणात्मक सहकार्य आणि दीर्घकालीन भागीदारी यावर भर देत आहोत. भारताचा कंटेंट उद्योग सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. निर्माते, निर्माता कंपन्या, प्लॅटफॉर्म्स, स्टुडिओ, वितरक आणि गुंतवणूकदार यांनी मुंबईत एकत्र येऊन उद्योगाच्या पुढील वाढीस दिशा द्यावी, असे आम्ही आवाहन करतो.”
नोंदणी व सहभागासाठी भारतीय प्रतिनिधींनी ऑनलाइन नोंदणी करावी. प्रदर्शन व प्रायोजकत्वाच्या संधी उपलब्ध असून, कंपन्यांना वरिष्ठ निर्णयकर्त्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. प्रायोजकत्व किंवा भागीदारीसाठी salesteam@contentindia.com या ईमेलवर संपर्क साधावा.
