पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक २५ मध्ये श्रृती वाकडकर यांच्या प्रचाराचा आज नारळ फुटणार
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या प्रभाग क्रमांक २५ मध्ये प्रचारार्थ पुनावळे गावठाण परिसरातील प्रमुख मार्गांवरून भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे.
आद्यदैवत श्री गणेशाच्या पवित्र अंगारक संकष्ट चतुर्थीचा शुभ योग साधत पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक २५ (वाकड, ताथवडे, पुनावळे) मधील भाजपाच्या (Bjp) अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ पुनावळे गावठाणातील काळभैरवनाथ मंदिररातून मंगळवारी ६ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर पॅनलच्या प्रचारार्थ पुनावळे गावठाण परिसरातील प्रमुख मार्गांवरून भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी उमेदवार श्रुती राम वाकडकर, राहुल कलाटे, कुणाल वाव्हळकर व रेश्मा चेतन भुजबळ उपस्थित असतील. काळ भैरवनाथ मंदिर, बोरगे वाडा, ओव्हाळ वस्ती, सावतामाळी मंदिर मार्गे पुनावळे हायवे चौक असा पदयात्रेचा मार्ग असणार आहे. या पदयात्रेत व प्रचार शुभारंभ सोहळ्यात पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
‘शरीफ है हम, किससे लड़ते नहीं, जमाना जानता है हम किसी के बाप से डरते नही
प्रचार शुभारंभा संदर्भात बोलताना श्रुती राम वाकडकर म्हणाल्या, कुठलेही पद नसताना मी, माझे पती रामभाऊ वाकडकर तसेच संपूर्ण वाकडकर कुटुंबियांनी गेली अनेक वर्षे समाजाची निष्ठेने नि: स्वार्थ सेवा केली आहे.
लोकांच्या हितासाठी सर्वतोपरी योगदान देण्याची आमची परंपरा आहे. त्यालाच अनुसरून जनहितासाठी वाटेल ते संघर्ष करून आमच्या प्रभागाचा सर्वांगीण विकास साधून प्रभागाला स्मार्ट प्रभाग आणि खऱ्या अर्थाने सर्वांच्या हिताचे सर्वसमावेशक रामराज्य आणण्याचा मी निश्चय केला आहे.
लोकांच्या प्रश्नांना ठोस आणि सक्षम पर्याय देण्याचा माझा निर्धार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागरिक-केंद्रित विकासाला अधिक गती देत प्रत्येक प्रश्नाचे वेळबद्ध आणि परिणामकारक उत्तर दिले जाईल.” तसंच, पदयात्रेदरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्यात येणार आहेत. “विकास, विश्वास आणि विजयाचा संकल्प” या संदेशासह भाजपने प्रभाग क्रमांक २५ मध्ये विकासाचा अजेंडा घराघरात पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
