पिंपरी-चिंचवडचा राजकीय पारा चढला ; मुख्यमंत्री फडणवीसांची सभा अन् सुनेत्रा पवारांच्या बैठका

Pimpri-Chinchwad Politics : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडचा राजकीय पारा चांगलाच चढला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या

  • Written By: Published:
Pimpri Chinchwad Politics

Pimpri-Chinchwad Politics : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडचा राजकीय पारा चांगलाच चढला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरीमुळे वातावरण ढवळून निघाले आहे. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या भोसरी मतदारसंघात गाठीभेटी घेतल्या.

यावेळी फडणवीस त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. “आमचे महेश दादा लांडगे जरा वैतागले होते. कारण निवडणुका आल्या की, अनेकांचा कंठ फुटतो. अनेक लोक काही काही बोलत असतात. पण दादा एक लक्षात ठेवा, आपले काम बोलते. त्या कामामुळेच हा वैताग आहे. त्या कामामुळेच हा त्रागा अन् राग आहे. जरा समजून घ्या दादा. ते रागवले म्हणून तुम्ही रागवू नका. तुम्ही फक्त आपली काम सांगा. समोरच्या लोकांना सांगायला काम नाही. त्यांना अनेक प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांची त्यांच्याकडे उत्तरे नाहीत. विकासावरुन या निवडणुकीची चर्चा ही कुठल्यातरी वादात झाली पाहिजे, सवाल-जबाव झाला पाहिजे, असा त्यांचा प्रयत्न आहे”, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अध्यक्ष अजित पवार यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी त्यांना उत्तर दिले. मात्र, त्यांनी पवार यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे वातावरण आणखी तापले. त्यामुळे राष्ट्रवादीने पुर्ण ताकद झोकून देत सुनेत्रा पवारही मैदानात उतरलेल्या. त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या.

अजित पवारांना मोफत प्रवासाची घोषणा करण्याचा अधिकार कोणी दिला ? चंद्रकांत पाटलांचा थेट सवाल

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते सचिन अहिर यांनी शिवसेनेच्या उमेदवारांसाठी रॅली काढली. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी किवळेमध्ये सभा घेतली.

follow us