दु:खद बातमी! फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, १८ जणांचा जागीच मृत्यू

मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांना घटनास्थळी भेट देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
Andra Pradesh

आंध्र प्रदेशच्या काकीनाडा जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. (Ajitdada) काकीनाडा जिल्ह्यातील वेत्लापलेम गावात असलेल्या एका फटाक्याच्या कारखान्यात शनिवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याचं समजतं.

दरम्यान, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती, आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री वंगालापुडी अनीता यांनी या घटनेची माहिती देताना व्यक्त केली. गृहमंत्री अनीता यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार १८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर सहा जण गंभीररीत्या भाजले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

तसेच, जिल्हा दंडाधिकारी सगीली शान मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटातील जखमींपैकी अनेकांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती आहे. अधिकृत माहितीनुसार, स्फोट झाला, तेव्हा कारखान्यात सुमारे २० जण काम करत होते. दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केलं.

मोठी बातमी! अजितदादांच्या अपघाताला महिना होत असतानाच धक्कादायक अहवाल समोर

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत ते म्हणाले, वेत्लापलेम गावातील फटाका कारखान्यात झालेली ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी तत्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून बचावकार्याचा आढावा घेतला आणि पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांना घटनास्थळी भेट देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, सरकार प्रभावित कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वासही त्यांनी दिला आहे.

Tags

follow us