आमदार रोहित पवार मुख्यमंत्र्यांना भेटले, अजित पवार प्रकरणात केली ‘ही’ मोठी मागणी

Rohit Pawar Meet Devendra Fadnavis :  अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यू प्रकरणात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार

  • Written By: Published:
Rohit Pawar Meet Devendra Fadnavis

Rohit Pawar Meet Devendra Fadnavis :  अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यू प्रकरणात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार रोहित पवार दरम्यान 10 मिनिटे चर्चा झाली. या भेटीनंतर आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी रोहित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांच्याकडे काही पुरावेही देत सामान्य नागरिकांच्या भावना मुख्यमंत्र्यांना सांगितल्या. मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे विषय मांडणार असं सांगितलं असल्याची माहिती रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. याचबरोबर देवगिरीवर दादांचं स्मारक असावं अशी विनंती  मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करत पुणे रिंग रोडला दादांचं नाव देण्याची मागणी केली असं  रोहित पवार म्हणाले.

तर दुसरीकडे या भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत एफआयआर नोंदविण्याबाबत देखील सविस्तर झाली असून या प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी अशी विनंती देखील मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली. तर याबाबत काही अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगतिले असल्याचे रोहित पवार म्हणाले. तर या भेटीदरम्यान अ‍ॅरो कंपनीबाबतही चर्चा झाली असून या प्रकरणात सरकारनेही लढा लढावा अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितले.

थातूरमातूर अहवाल देऊ नका

आज दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात एआयबीबीकडून अहवाल येण्याची शक्यता आहे. एआयबीबीने काही थातूरमातूर अहवाल न आणता सविस्तर अहवाल द्यावा अशी विनंती त्यांनी यावेळी केली. तर मुंबई आणि बारामतीमध्ये एफआयआर दाखल व्हावा अशी माझी इच्छा होती पण एफआयआर दाखल झाला नसल्याची माहितीही त्यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता रोजगार निर्मिती करावी ; ISBM College मध्ये चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

राज ठाकरे यांची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीपूर्वी आमदार रोहित पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटी दरम्यान राज ठाकरे यांनी अजित पवार विमान अपघात मृत्यू प्रकरणात पुरावेसह सविस्तर माहिती दिली असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

follow us