Ohh Shit..Ohh Shit विमान कोसळण्यापूर्वी कॉकपिटमधून आवाज, तपास अहवालातील मोठे मुद्दे

दुसऱ्या प्रयत्नात लँडिंग करण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी विमान पहिला झाडांना धडकले आणि नंतर जमिनीवर आदळल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

  • Written By: Published:
Ajit Pwar Accident

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाच्या अपघातासंदर्भात एएआयबीचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. (Ajitdada) दृश्यमानता कमी असतानाही लँडिंगचा प्रयत्न झाला, तसंच बारामतीचे विमानतळ हे अनियंत्रित विमानतळ असून त्या ठिकाणी महत्त्वाच्या सुविधांचा अभाव असल्याचा ठपका या अहवालात म्हटलं आहे.

त्याचबरोबर दुसऱ्या प्रयत्नात लँडिंग करण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी विमान पहिला झाडांना धडकले आणि नंतर जमिनीवर आदळल्याचं या अहवालात म्हटलं आहे. तसेच लँडिंगवेळी ‘ओह शीट, ओह शीट’ हे शब्द ऐकू आल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. रनवेची दृश्यमानता कमी होती, साधारणतः पाच किलोमीटर दृश्यमानता आवश्यक होती.

नाशिक येथील मराठी संमेलनात दादासाहेब साहेब फाळके चित्रनगरीच्या दालनाचे उद्घाटन

दृश्यमानता 3 किलोमीटरपर्यंत असल्याची माहिती नियंत्रकाने कॉकपिटला कळवली. त्यावेळी विमानाने पुन्हा एक वळण घेतलं. त्यानंतर रनवे दिसतोय असं नियंत्रकाला सांगण्यात आलं. मग लँडिंग क्लिअरन्स देण्यात आला. त्यानंतर लँडिंगवेळी ‘ओह शीट, ओह शीट’ हे शब्द ऐकू आले. तसेच या विमानातील दोन्ही पायलटनी मद्यपान केलं नसल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.

प्राथमिक अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

पहिल्या लँडिंग प्रयत्नानंतर पायलटने Go-Around केले.
दुसऱ्या प्रयत्नावेळी रनवे 11 वर लँडिंग क्लीअरन्स मिळाले
अपूर्ण पायाभूत सुविधा असलेल्या अनियंत्रित विमानतळावर लँडिंग झालं.
दृश्यमानता किमान मर्यादेपेक्षा कमी असताना लँडिंगचा प्रयत्न झाला.
अंतिम क्षणी कॉकपिटमधून “Oh S**t…” असा आवाज आला
विमान रनवेच्या डाव्या बाजूला सुमारे 50 मीटर अंतरावर कोसळले
विमान प्रथम झाडांना धडकले आणि नंतर ते जमिनीवर आदळले
अपघातानंतर विमानाला आग लागली, कॉकपिट आणि केबिन पूर्णपणे जळाले.
अपघाताच्या अंतिम कारणांचा तपास अद्याप सुरू.

बारामती विमानतळातील सुरक्षा त्रुटी

रन वेवरील मार्किंग सहज दिसू शकतील असे नाहीत.
रन वेवर बारीक खडी (Loose Gravels) आढळली.
रन वेला परिपूर्ण कुंपण (Boundary Wall) नाही.
विमानतळावर अग्निशमन (ARFF) सुविधा नाही.
फक्त VFR ऑपरेशन्सला परवानगी.
अनकंट्रोल्ड एअरफिल्ड आहे, नियमित ATC सुविधा नाही.
ब्लॅक बॉक्स (Flight Recorders)
FDR (Flight Data Recorder) डेटा यशस्वीरित्या डाउनलोड
CVR (Cockpit Voice Recorder) थर्मल डॅमेज; डेटा पुनर्प्राप्तीसाठी NTSB (USA) मदत तपास अद्याप सुरू

विमानासंबंधी काय म्हटलंय?

विमानाचे नोंदणी, एअरवर्थिनेस प्रमाणपत्र वैध आहे.
शेवटचे Inspection मार्च 2025 मध्ये झाले.
इंजिन तपासणी वैध.
अंतर्गत कोणतीही प्रलंबित बाब नव्हती.
वजन आणि इंधन मर्यादा नियमांनुसार

अहवालातील मुख्य शिफारशी

विमान वाहतूक महासंचालनालयाने तात्काळ सर्व फ्लाईट ऑपरेटर्सना अनियंत्रित विमानतळावर आवश्यक SOP पाळण्याचे निर्देश द्यावेत.
हवामानाची परिस्थिती नियमानुसार असेल त्याचवेळी अनियंत्रित विमानतळांवर विमान उतरवणे किंवा उड्डाणासाठी परवानगी दिली जावी. याविषयीच्या सूचना

विमानतळ चालवणाऱ्या सर्व संस्थांनाही महासंचालनालयाने द्याव्यात.
विमान उतरवण्याच्या वेळी हवामानविषयक बेसिक माहिती देणारी व्यवस्था सर्व विमानतळांवर असेल हे DGCA ने पहावे. संबंधित विमानतळ विमान सेवांसाठी योग्य आहे का याविषयीची व्यवहार्यता डीजीसीएने तपासावी.

follow us