मी बोलतो, तीच भाजपची अधिकृत भूमिका इतरांचं… वादग्रस्त व्यक्तव्यांवरून फडणवीसांकडून राणेंची कान उघडणी
CM Deverndra Fadanvis on Nitesh Rane फडणवीस राणेंना समज देतात की, नाही यावर उत्तर देताना फडणवीसांनी राणेंची कान उघडणी केली
CM Deverndra Fadanvis Open Nitesh Rane’s ears over controversial statements : भाजपाचे मंत्री निलेश राणे हे नेहमीच आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका घेताता. त्यामध्ये ते वादग्रस्त वक्तव्य देखील करतात. यावर एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, फडणवीस राणेंना समज देतात की, नाही यावर उत्तर देताना फडणवीस यांनी राणेंची कान उघडणी केल्याचे पाहायला मिळालं.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
भाजपने महाराष्ट्रमध्ये मला पक्षाचा सर्वोच्च नेता म्हणून निवडलेलं आहे. त्यामुळे राज्यामध्ये मी जे बोलतो तीच पक्षाची अधिकृत भूमिका असते. इतरांची भूमिका हे त्यांचं वैयक्तिक मत असतं. असं म्हणत फडणवीसांनी आक्रमक हिंदुत्त्ववादी आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंची कानउघडणी केली.
मात्र यावेळी राणेंच्या मदरशांच्याबाबतील व्यक्तव्याचं त्यांनी समर्थन देखील केलं. ते म्हणाले की, नितेश राणे कधी-कधी जास्त बोलतात तेव्हा मी त्यांना सांगत असतो की, तुमचं हे वक्तव्य योग्य नाही. तुम्ही असं बोलायला नाही पाहिजे. मात्र मदरशांबाबत त्यांनी जे वक्तव्य केलं आहे. त्यावेळी काही मदरशांमध्ये बाहेरून फंडिग येत होतं. तसेच तेथे जे शिकवलं जात होतं. ते शिकवण्या सारखं नव्हतं त्यामुळे त्यावर नितेश राणेंनी तसं विधान केलं होतं.
