‘बूंग’ चित्रपटाने 79व्या ब्रिटिश अ‍ॅकॅडमी फिल्म अवॉर्ड्स (BAFTA) जिंकत रचला इतिहास

British Academy Film Awards: या चित्रपटाचे निर्माते रितेश सिधवानी, फरहान अख्तर, लक्ष्मीप्रिया देवी आणि एलन मॅकअ‍ॅलेक्स या सोहळ्यास उपस्थित होते.

  • Written By: Published:
British Academy Film Awards

British Academy Film Awards:एक्सेल एंटरटेनमेंट, चॉकबोर्ड एंटरटेनमेंट आणि सूटेबल पिक्चर्स यांच्या समीक्षकांनी गौरवलेल्या ‘बूंग’ (Boong) या चित्रपटाने 79व्या ब्रिटिश अ‍ॅकॅडमी फिल्म अवॉर्ड्समध्ये )BAFTA) ‘बेस्ट चिल्ड्रन्स अँड फॅमिली फिल्म’ या गटात बाफ्टा पुरस्कार जिंकत ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या प्रतिष्ठित सोहळ्याचे आयोजन लंडनमधील (Royal Festival Hall) येथे करण्यात आले होते.

या चित्रपटाचे निर्माते रितेश सिधवानी, फरहान अख्तर, लक्ष्मीप्रिया देवी आणि एलन मॅकअ‍ॅलेक्स या सोहळ्यास उपस्थित होते. चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मीप्रिया देवी यांनी केले आहे. मुलांच्या भावविश्वावर आधारित हा भावनिक चित्रपट जगभरातील अनेक मोठ्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

भारतीय प्रादेशिक कथा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवणारा हा महत्त्वाचा सहयोगी प्रकल्प ठरला आहे. ‘बूंग’ने ‘झूटोपिया 2’, ‘लिलो अँड स्टिच’ आणि ‘आर्को’ यांसारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांना मागे टाकत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला आहे.

चित्रपटाची कथा एका लहान मुलाभोवती फिरते, जो आपल्या आईला खास भेट देऊन तिला आश्चर्यचकित करू इच्छितो. त्याच्या मते, वेगळे राहणारे वडील पुन्हा घरी आणणे हाच सर्वात मौल्यवान भेटवस्तू ठरू शकतो. वडिलांच्या शोधात त्याचे आयुष्य विस्कळीत होते; मात्र शेवटी त्याला अशी भेट मिळते, ज्याची त्याने कल्पनाही केलेली नसते.

follow us