राष्ट्रवादीत पुन्हा वाद, पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर वरिष्ठ नेत्यांची नाराजी; सुनेत्रा पवार मोठा निर्णय घेणार?
Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी
Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांची भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अमित शाह यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत मंत्रिमंडळ फेरबदल चर्चासह पार्थ पवार यांच्याविषयी तक्रार करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) काही वरिष्ठ नेत्यांनी अमित शाह (Amit Shah) यांच्यासमोर पक्षातील प्रमुख पदांबाबत पार्थ पवार (Parth Pawar) यांच्याकडून करण्यात आलेल्या नेमणुका, सुनील तटकरे (Sunil Tatkare) , प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्या पक्षातील स्थानाबाबत आणि प्रमुख नेत्यांना वगळत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि पार्थ पवार यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांशी साधलेला संवाद यावर तक्रार केली आहे. तर दुसरीकडे 2 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटी बैठकीत देखील पार्थ पवार उपस्थित नसल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. यातच आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार काही मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत काही नेत्यांकडून पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यात आली असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्दीकी आणि पक्षाचे प्रवक्ते पदी उमेश पाटील यांची निवड करताना पक्षाच्या कोअर कमिटीतील सदस्यांना विश्वासात घेणे अपेक्षित होते मात्र त्यांनी परस्पर निवड करण्यात आली असल्याने काही नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती समोर आली आहे.
अमित शाहांसोबत दोन तास बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल पटेल, दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडेसह इतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची रविवारी भेट घेतली. या भेटीदरम्यान नेत्यांनी अर्थखात्याचा मुद्दा शाहांसमोर उपस्थित करत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र नकोच अशी भूमिका घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.
मोठी बातमी, ग्लेन मॅक्सवेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती-
दोन तास सुरु असणाऱ्या या बैठकीत खासदार पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित नव्हते. या बैठकीत नेत्यांनी पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवार काय निर्णय घेणार याबाबत सध्यातरी राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.