विकासकामांमुळे नागरिकांच्या मनात युतीबद्दल शाश्वत वातावरण निर्माण झाले : आमदार संग्राम जगताप
MLA Sangram Jagtap: आता या विकासाच्या रथाला आधीक गती देण्यासाठी नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा युतीच्याच नगरसेवकांनाच निवडून द्यावे,
अहिल्यानगर : महानगरपालिकेसाठी युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. अहिल्यानगर शहरात (Ahilyanagar MahaPalika Election) झालेल्या विकासकामांमुळे नागरिकांच्या मनात शाश्वत वातावरण निर्माण झाले आहे की हे युतीचे लोकप्रतिनिधीच विकासकामे करू शकतात. राज्य सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी फक्त आम्हीच आणू शकतो. आता या विकासाच्या रथाला आधीक गती देण्यासाठी नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा युतीच्याच नगरसेवकांनाच निवडून द्यावे, असे आवाहन आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी केले आहे.
“शेकडो दारं, अनेक सदस्य… आणि एकच बॉस!” बिग बॉस मराठी परततोय 11 जानेवारीपासून!
आमदार जगताप म्हणाले, युतीचे सर्व उमेदवार हे दमदार आहेत. आनंदी बाजार, पटवर्धन चौक या भागाच्या विकासासाठी किशोर डागवाले यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे या परिसरात काँक्रिटचे रस्ते झाले आहेत. सर्व उमेदवारांनी प्रत्येक मतदारापर्यंत पोहचून झालेल्या विकास कामांची माहिती द्यावी. मतदानाचे विभाजन होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन आ.संग्राम जगताप यांनी केले. (
Development works have created a lasting atmosphere in the minds of citizens regarding the Mahayuti alliance: MLA Sangram Jagtap)
कलाटेंच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवडच्या बहुचर्चित प्रभाग क्रमांक 25 मधील भाजपचा प्रचाराचा नारळ फुटणार…
राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा युतीचे प्रभाग 11 मधील युतीचे उमेदवारांच्या प्राचार कार्यालयाचे उद्घाटन आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रभाग 11 चे उमेदवार आशा डागवाले, दीप्ती गांधी, सुभाष लोंढे व विकास वाघ यांच्यासह माजी सभापती किशोर डागवाले, संभाजी लोंढे, श्रीमती सरोज गांधी, रोहन डागवाले, रोहित डागवाले, सुवेंद्र गांधी, आरती आढाव यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. किशोर डागवाले यांनी स्वागत करून या भागाच्या विकासासाठी आ.संग्राम जगताप यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.
