रेड जायंट मूव्हीजच्या ‘KHxRK’ मध्ये 47 वर्षांनंतर कमल हासन आणि रजनीकांत पुन्हा एकत्र येणार

भारतीय सिनेमातील दोन दिग्गज आणि प्रतिष्ठित अभिनेते कमल हासन आणि रजनीकांत तब्बल 47 वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.

  • Written By: Published:
Untitled Design (14)

Kamal Haasan and Rajinikanth will reunite after 47 years : रेड जायंट मूव्हीजची ‘KHxRK’ ही चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय सिनेमातील दोन दिग्गज आणि प्रतिष्ठित अभिनेते कमल हासन आणि रजनीकांत तब्बल 47 वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही महान कलाकारांनी शेवटचे एकत्र काम 1970 च्या दशकात केले होते. जवळपास पाच दशकांनंतर त्यांची ही पुनर्भेट भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वात मोठ्या घटनांपैकी एक मानली जात आहे. कारण हा चित्रपट अशा दोन दैदीप्यमान परंपरांचा संगम आहे, ज्यांनी केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही पिढ्यान् पिढ्या प्रेक्षकांना प्रभावित केले आहे.

सध्या या चित्रपटाची निर्मिती Red Giant Movies करत असून, या दोन्ही सिनेमाई दिग्गजांना पुन्हा एकत्र आणण्याचे स्वप्न त्यांनी साकार केले आहे. निर्मिती संस्थेने या चित्रपटाला भव्यता, परंपरा आणि उत्कृष्ट कथनशैलीचा उत्सव म्हणून सादर करण्याचा संकल्प केला आहे. या निमित्ताने रेड जायंट मूव्हीजच्या प्रवक्त्यांनी सांगितले, “कमल हासन सर आणि रजनीकांत सर यांना या चित्रपटासाठी एकत्र आणणे हे आमच्यासाठी स्वप्न साकार झाल्यासारखे आहे.

माझ्या हातून फक्त एक हत्या झाली; माजी भाजप खासदाराच्या कबुलीने नव्या वादाला तोंड फुटणार?

या ऐतिहासिक क्षणाचा भाग बनताना आम्हाला प्रचंड अभिमान, कृतज्ञता आणि उत्साह वाटत आहे. भारतीय सिनेसृष्टीसाठी हा भावनिक आणि ऐतिहासिक क्षण आहे. आम्ही ही वाटचाल पूर्ण जबाबदारी आणि कृतज्ञतेच्या भावनेतून सुरू करत आहोत. त्यांच्या अद्वितीय योगदानाचा आणि वारशाचा प्रभावी सन्मान करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.” या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार करत आहेत.

त्यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट जेलर द्वारे मोठे यश मिळवत स्वतःला देशातील प्रभावशाली व्यावसायिक दिग्दर्शकांपैकी एक म्हणून सिद्ध केले आहे. चित्रपटाचे संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले असून, त्यांच्या संगीतामुळे अनेक चित्रपटांनी अभूतपूर्व यश मिळवले आहे. कमल हासन आणि रजनीकांत यांच्या अप्रतिम अभिनयाने सजलेला हा चित्रपट तमिळ, तेलुगू आणि हिंदी या तीन भाषांमध्ये भव्य स्तरावर प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाबाबतची इतर माहिती सध्या गोपनीय ठेवण्यात आली असून, ती लवकरच अधिकृतपणे जाहीर केली जाणार आहे. मात्र इतके निश्चित आहे की ‘KHxRK’ भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एक अविस्मरणीय अध्याय जोडणार आहे.

follow us