विकासाची व्हिजन अन् धडाडीमुळे संदीप लोणकर यांची प्रभाग क्रमांक 15 मध्ये आघाडी!
Sandeep Lonkar : ग्रामपंचायत असल्यापासून तळागाळातील समाजासह सर्व घटकांमधील नागरिकांशी दांडगा संपर्क आणि पुणे महापालिकेत मांजरी
Sandeep Lonkar : ग्रामपंचायत असल्यापासून तळागाळातील समाजासह सर्व घटकांमधील नागरिकांशी दांडगा संपर्क आणि पुणे महापालिकेत मांजरी, केशवनगर, साडेसतरानळी, मुंढवा आदी परिसराचे आश्वासक प्रतिनिधित्व करण्याची धडाडी, याच्या जोरावर शिवसेनेचे संदीप लोणकर यांनी मतदानाला सामोरे जाताना प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी घेतली आहे. पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 15 मध्ये संदीप लोणकर यांची शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून असलेली उमेदवारी प्रारंभीपासूनच प्रबळ ठरत होती.
लोणकर यांनी यापूर्वी ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून आश्वासक कामगिरी केली होती. त्याच्या जोडीला आता, विकासाचे व्हिजन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांनी शिवसेनेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला 100 कोटींचा निधी आणि लाडक्या बहिणींचे समर्थन या मुद्द्यांच्या जोरावर लोणकर यांची प्रचार संपवून मतदानाला सामोरे जाताना आघाडी दिसून येत आहे.
राज्यशास्त्र आणि निवडणूक शास्त्र शाखेच्या अभ्यासाकांनी या प्रभागात प्रचारादरम्यान मतदारांचा कानोसा घेतला. त्यावेळी संदीप लोणकर यांच्या पाठीमागे जनता भक्कमपणे उभी असल्याचे चित्र दिसले. मांजरी केशवनगर साडेसतरानळी प्रभागात रस्ते, सांडपाणी, पाणीपुरवठा यासारख्या पायाभूत सुविधा देणारी विविध विकासकामे केली आहेत. पुणे शहर आणि समाविष्ट गावांचा कायापालट करण्यासाठी शिवसेनेने सुधारणा आणि विकासात्मक योजनांचा धडाकेबाज कृती आराखडा जाहीर केला आहे.
पुणे महापालिकेत आमचे प्रतिनिधित्व करताना या सर्व योजना पूर्ण करण्याची धडाडी संदीप लोणकर यांच्यामध्ये आहे, अशा शब्दात नागरिकांनी माध्यम प्रतिनिधींकडे आपल्या भावना व्यक्त केल्या.
निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या खिशात; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकर माफ करू, वाहतूक एकात्मिक विकास आराखडा मंजूर करून कोंडीमुक्त रस्ते, पाणीपुरवठा, नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील सोसायट्यांसाठी सांडपाणी वाहिन्यांचे जाळे, अपघातमुक्त वाहतूक, वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी प्राधान्याने रस्ता रुंदीकरण आदी विकासकामांसाठी निधी या शिवसेनेने दिलेल्या विकासाच्या शब्दाची पूर्तता संदीप लोणकर हेच करू शकतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
