महायुतीची मैत्रिपूर्ण लढत ठरली; पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला
Pune Teachers Constituency Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आल्याने
Pune Teachers Constituency Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठा निर्णय घेत अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा देणार आहे. माहितीनुसार, काल (14 ऑक्टोबर) याबाबत उशीरा नंदनवनमध्ये घडामोडी घडताना दिसल्या. या जागेसाठी सुरुवातीपासून शिवसेनेकडून मागणी करण्यात येत होती मात्र जागावाटपात ही जागा भाजपला सुटल्याने अनेक शिवसेनेचे नेते नाराज झाले होते. तर दुसरीकडे मंगेश चिवटे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता मात्र अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी अर्ज मागे घेण्याची घोषणा केली होती. यानंतर पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तर आता अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनाने घेतल्याने भाजप आणि शिवसेनेत मैत्रिपूर्ण लढत होणार आहे.
शिवसेना शिंदे गटाने (Shivsena) अपक्ष उमेदवार सचिन सानप (Sachin Sanap) यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने आता या निवडणुकीत मुख्य लढत भाजप (BJP) उमेदवार कैस्तुभा गावडे (Kaustubh Gavde) आणि अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्यात होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत शिवसेना उमेदवार मंगेश चिवटे (Mangesh Chivte) यांना यांच्या उमेदवारी अर्ज माघारीवर निर्णय झाला असल्याची देखील माहिती समोर येत आहे. या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.
‘पीस बॉन्ड’ म्हणजे काय? उल्लंघन केल्याने CJP नेत्यांना अटक –
माहितीनुसार, मंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय म्हणून सचिन सानप यांची ओळख आहे. त्यांनी या निवडणुकीत अपक्ष अर्ज भरला होता तर शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता मात्र एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता.