संगमनेर बस स्थानक ते प्रवरा नदी पूल रस्त्यासाठी 10 कोटींचा निधी मंजूर
MLA Amol Khatal : संगमनेर शहरातील पायाभूत सुविधा च्या विकासाला चालना मिळावी म्हणून महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास आराखडा 2026-27 च्या
MLA Amol Khatal : संगमनेर शहरातील पायाभूत सुविधा च्या विकासाला चालना मिळावी म्हणून महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास आराखडा 2026-27 च्या अंतर्गत संगमनेर बसस्थानक बांधकाम विभाग कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, दिल्ली नाका मार्गे प्रवरा नदीवरील पूल या रस्त्याचे नागरी सविधासह विकास काम करण्यासाठी 10 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती आमदार अमोल खताळ पाटील यांनी दिली.
संगमनेर शहराच्या बस स्थानक (Sangamner Bus Stand) ते तीन बत्ती चौक मार्गे प्रवरा नदी फुला पर्यंत हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून, शहरातील प्रमुख भागांना जोडणाऱ्या या मार्गावरून वाहनांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्याचा नागरी सुविधांसह विकास झाल्यास शहरातील वाहतूक व्यवस्थेला अधिक शिस्त आणि सुसूत्रता प्राप्त होण्यास मदत होणार आहे. तसेच रस्त्याच्या विकासामुळे नागरिकांना अधिक चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
संगमनेर शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार अमोल खताळ (MLA Amol Khatal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुनेत्रा पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; आकाश दीपसह ‘या’ खेळाडूला पुन्हा संधी
विकासासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर – अमोल खताळ पाटील
संगमनेर शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. संगमनेर बसस्थानक ते प्रवरा पूल या महत्त्वाच्या रस्त्याच्या विकासासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने शहराच्या विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे.