शिवसेनेच्या जाहीरनाम्यातून लोकांच्या समस्या सोडवणार; संदीप लोणकर यांचा निर्धार
पुणे ही सांस्कृतिक राजधानी असून, येथे धाकदपटशा, दादागिरी चालत नाही. पुणे शहर गुन्हेगारीमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, झोपडपट्टीमुक्त करायचे आहे.
पुणे शहर आणि समाविष्ट गावांचा कायापालट करण्यासाठी शिवसेनेने सुधारणा आणि विकासात्मक योजनांचा धडाकेबाज कृती आराखडा जाहीर केला आहे. (Pune) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुण्यासाठी ‘शब्द शिवसेनेचा’ या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. शिवसेनेचे वरिष्ठ नेते उदय सामंत, डॉ. नीलम गोन्हे, महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर, सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांच्यासह उमेदवार उपस्थित होते.
पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकर माफ करू, वाहतूक एकात्मिक विकास आराखडा मंजूर करून कोंडीमुक्त रस्ते, पाणीपुरवठा, नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील सोसायट्यांसाठी सांडपाणी वाहिन्यांचे जाळे, अपघातमुक्त नवले पूल आणि शहरातील वाहतूक, पुण्याच्या विविध भागातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी प्राधान्याने रस्ता रुंदीकरण आदी विकासकामांसाठी निधी मंजूर करू आणि पुणे महापालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षात पुण्याला विकासाचे अमृत पाजू,’ अशी आश्वासनांची खैरातही एकनाथ शिंदे यांनी केली.
आम्ही संविधान आणखी मजबूत करू; वाकडमध्ये रामदास आठवलेंची जोरदार सभा
पुणे ही सांस्कृतिक राजधानी असून, येथे धाकदपटशा, दादागिरी चालत नाही. पुणे शहर गुन्हेगारीमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, झोपडपट्टीमुक्त करायचे आहे. शहरातील जुन्या वाड्यांचा पुनर्विकास करायचा आहे. लाडक्या बहिणींचा विरोध असेल, तर पाण्याचे मीटर काढून टाकू,’ अशी आश्वासनेही शिंदे यांनी दिली.’पुणे महापालिकेत सत्तेत असलेले कारभारी बदलून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. मी मुख्यमंत्री असताना अनेक विकास प्रकल्प आणि कल्याणकारी योजना राबविल्या. त्या आता अधिक जोराने पुण्यामध्ये शिवसेनेतर्फे राबवण्यात येतील असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
‘पुणे शहर पब संस्कृती, गुन्हेगारी आणि वाहतूक कोंडीतून मुक्त करू, असे आश्वासनही शिवसेनेने दिले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या धडाकेबाज नेतृत्वाच्या जोरावर कायमच शहर वाड्या वस्त्यांमध्ये सुधारणा आणि विकास कामांवर भर देण्यात आला आहे. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या प्रभाग क्रमांक १५ मांजरी बुद्रुक केशवनगर साडेसतरानळी शेवाळेवाडी परिसराचा कायापालट घडवून दाखवू असा निर्धार संदीप लोणकर यांनी व्यक्त केला.
