Maharashtra Rain : नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये उद्या ढगफुटीची शक्यता, फडणवीसांनी काय सांगितलं?

Maharashtra Rain राज्यात सर्वदूर पावसाने थैमान, ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत, दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला मोठा फटका

  • Written By: Published:
CM Fadnavis

Maharashtra Rain Live Updates : राज्यात सर्वदूर पावसाने थैमान घातले असून, ठिकठिकाणी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. घाटमाथ्यावर दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. नेमकी पुण्या-मुंबईसह राज्यातील पावसाची नेमकी परिस्थिती काय त्याची प्रत्येक मिनिटांची माहिती देणारा लेट्सअपचा लाईव्ह ब्लॉग…

 

LIVE NEWS & UPDATES

  • 06 Jul 2026 02:21 PM (IST)

    ''नाशिकमध्ये उद्या ढगफुटीसह 300 मिमी. पावसाची शक्यता, ८ जुलै पर्यंत अतिवृष्टी”

    नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरासाठी अत्यंत चिंतेची आणि मोठी बातमी समोर येत आहे. उद्या या भागात तीव्र ढगफुटी होण्याची दाट शक्यता असून, एकाच दिवसात तब्बल 300 मिमी इतका विक्रमी पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः याबाबतची माहिती देत नाशिक जिल्ह्याला सर्वात महत्त्वाचा इशारा दिला आहे. नाशिकच्या बऱ्याच मोठ्या भागात ढगफुटी होऊ शकते, त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी केलेली आहे. नाशिक शहर किंवा नाशिक जिल्हा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ढगफुटीमुळे जी परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्याची पडताळणी करून बऱ्याचशा उपायोजना करण्यात आलेल्या आहेत. यावर आपल्याला अतिशय करडी नजर ठेवावी लागणार आहे," अशी माहिती त्यांनी दिली आहे.

  • 06 Jul 2026 01:28 PM (IST)

    लोणावळ्यातील पर्यटनावर 31 ऑगस्टपर्यंत निर्बंध लागू

    राज्यातील विविध भागात कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असताना आता लोणावळ्यात पर्यटनासाठी 31 ऑगस्टपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार ​भाजे धबधबा व भाजे लेणी, ​कार्ला लेणी व एकवीरा देवी परिसर, ​किल्ले लोहगड, विसापूर, तिकोणा आणि तुंग किल्ला तसेच टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलंग पॉईंट (मौजे आतवण परिसर) याठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला ा आहे.

    या गोष्टींवर पूर्णपणे बंदी 

    ​वेगाने वाहणाऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या पाण्यात उतरणे किंवा पोहणे. ​धबधब्यांच्या खाली बसणे किंवा मुख्य प्रवाहात जाण्यास तसेच
    ​धोकादायक ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे आणि धोकादायक वळणांवर सेल्फी काढण्यास व कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण (व्हिडिओ शूटिंग) करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. ​धबधबे आणि पर्यटन परिसरात मद्य बाळगणे, वाहतूक करणे, अनधिकृत विक्री करणे, मद्यपान करून प्रवेश करणे किंवा उघड्यावर दारू पिण्यासही मनाई करण्यात आली आहे. ​सार्वजनिक ठिकाणी डिजे (DJ) सिस्टीम, मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा किंवा गाड्यांमधील स्पीकर्स/वूफर वाजवून ध्वनी प्रदूषण करणे. तसेच  ​वाहतुकीचे रस्ते किंवा धोकादायक वळणांवर वाहने थांबवून ठेवणे. ​अतिवेगाने किंवा वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने बेदरकारपणे वाहन चालवणे आणि ओव्हरटेक करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय  धबधबे, धरणे आणि नदी परिसरात सर्व प्रकारच्या दुचाकी, चारचाकी व सहाचाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई आहे. ​सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकॉल किंवा प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर टाकणे.

  • 06 Jul 2026 12:35 PM (IST)

    पुण्यात 51 ठिकाणी झाडपडीच्या घटना

    पुणे शहरात संततधार पावसाने काल (दि.5) सायंकाळी पाच ते आज (दि.6) दुपारी एकपर्यंत झाडपडीच्या 51 घटना घडल्या आहेत. अग्निशमन दलाकडून सतर्कता बाळगत वरील घटनांवर कामगिरी पूर्ण असून जखमी वा जिवितहानी नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

     

  • 06 Jul 2026 12:22 PM (IST)

    मावळमध्ये भूस्खलन, ढिगाऱ्याखाली कुटुंब गाडलं गेलं

    पुण्यातील मावळ तालुक्यातील पाठण गावात दुर्दैवी घटना घडलीये. अतिवृष्टीमुळे विसापूर किल्ल्याचा एक भाग कोसळून या गावातील एक कुटुंब गाडलं गेलंय. नंदू तिकोणेंच्या कुटुंबावर काळरात्र चालून आली आहे. नंदू तिकोने, पत्नी आणि मुलगा घरात असताना काळाने घाला घातला. या तिघांचा शोध सुरु एनडीआरएफ पथकाकडून सुरुये. एकाचा मृतदेह सापडला आहे.

  • 06 Jul 2026 12:20 PM (IST)

    मुंबई-पुण्याला पावसाने झोडपलं; अचानक अजित पवारांचा व्हिडिओ समोर...

    मुंबई आणि पुण्यात मध्यरात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे दोन्ही शहरांतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. एकीकडे मुंबई-पुण्याला पावसाने झोडपून काढलेलं असताना उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्याला अजित पवारांची आठवण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस तसेच प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सोशल मीडियावरुन अजित पवार आज या पावसाच्या परिस्थितीमध्ये असते तर काय चित्र दिसलं असतं याबद्दलची पोस्ट केली आहे.

    चव्हाणांच्या पोस्टमध्ये नेमकं काय?

    सूरज चव्हाण यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये अजित पवारांचा अशाच आपत्कालीन परिस्थितीदरम्यान थेट कंट्रोल रुममधून आढावा घेताना जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. 'दादा मिस यू' या मथळ्याखाली सूरज यांनी ही पोस्ट केली आहे. आज तुम्ही असता तर सकाळी लवकर आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात जाऊन पावसामुळे अडचणीत आलेल्या नागरिकांचं नियोजन केलं असतं. प्रशासनावर वचक आणि काम करून घेण्याची धमक असणारा कामाचा माणूस आज आमच्यासोबत नाही ती उणीव सदैव जाणवते," अशा भावनिक शब्दांमध्ये सूरज चव्हाण यांनी अजित पवारांचा जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे.

  • 06 Jul 2026 11:54 AM (IST)

    अतिमुसळधार पावसाचा अधिवेशनाला फटका; कामकाज दिवसभरासाठी तहकूब

    राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आजही सुरूच आहे. पावसाचा जोर कमी होण्याची चिन्हे नाहीत. वाऱ्यामुळे मुंबईत एका दिवसात ३५० झाडे पडल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अतिमुसळधार पावसाचा अधिवेशनाला फटका बसला असून, विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. उद्या 11 वाजता कामकाज सुरु होणार आहे.

  • 06 Jul 2026 11:45 AM (IST)

    दुपारनंतर नागरिकांनी अधिक सजग राहावे; फडणवीसांनी नेमकं काय सांगितलं?

    मुंबईत दरवर्षी मान्सूनमध्ये सरासरी 800 झाडं कोसळतात. पण काल एकाच दिवसात 350 झाडं पडली. आजचा दिवस त्यापेक्षाही गंभीर आहे. म्हणून वर्क फ्रॉम होमची विनंती केली. दुपारनंतर ताशी 70 ते 90 किलोमीटर वेगाने वार वाहणार आहेत” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. “आज दुपारनंतर खूप मोठ्या प्रमाणात वारं असणार आहे. त्याचा झाडांवर परिणाम होऊ शकतो. त्या दृष्टीने लोकांनी सजग राहणं आवश्यक आहे. लोकांनी सावध रहावं. शक्यतो प्रवास टाळावा. अत्यंत गरजेचं असल्याशिवाय प्रवास करु नये. युवा वर्गाला विशेष आवाहन आहे, आजचं वारं बघता त्यांनी टूरिजम टाळावं” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलं.

  • 06 Jul 2026 11:40 AM (IST)

    आळंदीमध्ये येऊ नका; अत्यंत महत्त्वाचे सार्वजनिक आवाहन

    आषाढी वारी २०२६ – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा सुरू होणार असून, पावासाचा जोर बघता वारकऱ्यांना आणि भाविकांना आळंदीमध्ये न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व वारकरी, भाविक व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की, इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नाही. ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणीच सुरक्षित थांबावे व आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये.

    कृपया प्रशासन, पोलीस यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच नदीपात्र, घाट परिसर व बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाणे टाळावे. आपल्या सुरक्षिततेसाठी प्रशासन आवश्यक ती सर्व उपाययोजना करत आहे. सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, ही नम्र विनंती.

     

  • 06 Jul 2026 11:13 AM (IST)

    पुणे मुंबई दरम्यानची एसटी वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद

    पुणे-​मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे, पुढील आदेश येईपर्यंत पुणे-मुंबई दरम्यानची सर्व एसटी बस वाहतूक बंद करण्यात आली आहे.​सकाळी पुण्याहून मुंबईसाठी निघालेल्या ४ एसटी बसेस 'उर्से टोल नाका' परिसरात अडकल्या होत्या, त्यांना सुरक्षितपणे पुन्हा पुण्यात माघारी बोलावण्यात आले आहे. कृपया प्रवाशांनी सहकार्य करावे आणि रस्ता मोकळा होईपर्यंत प्रवासाचे नियोजन करू नये अशी माहिती एसटी पुणे विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी दिली आहे.

     

  • 06 Jul 2026 11:09 AM (IST)

    मुंबईत पावसाचा रेड अलर्ट, खासगी कंपन्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम'च्या सूचना, सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे, शासनाकडून अधिसूचना जारी

    भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनाकडून महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर आता खासगी कंपन्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम'च्या सूचना देण्यात आल्या आहेत तर, सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे देण्यात आला आहे. याबाबत शासनाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

  • 06 Jul 2026 11:04 AM (IST)

    मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नेमकी परिस्थिती काय?

    ​कर्जत/लोणावळा परिसरातील दरड कोसळल्याच्या घटनेनंतर 'मिसिंग लिंक' महामार्गावरील ताज्या परिस्थिबाबत महामार्ग पोलीस वाहतूक अपडेट देण्यात आले आहे. त्यानुसार  मुंबईहून पुण्याच्या दिशेने मिसिंग लिंकद्वारे मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक आता पूर्णपणे पूर्ववत (सुरू) करण्यात आली आहे. तर, पुण्याहून मुंबईच्या दिशेने मिसिंग लिंकद्वारे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक अजूनही बंद आहे.
    ​उड्डाणपूल आणि मिसिंग लिंक बंद असल्याने पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहने जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने (NH 48) वळवण्यात आली आहेत. मुंबईच्या दिशेने प्रवास करत असल्यास जुन्या महामार्गाचा वापर करा आणि संयम राखण्याचे तसेच सुरक्षेचे नियम पाळण्याचे आवाहन ​महामार्ग पोलिसांकडून ​वाहनचालकांना करण्यात आले आहे.

  • 06 Jul 2026 11:00 AM (IST)

     पावसाचा मुंबई-पुणे रेल्वेला फटका; अनेक गाड्या रद्द, काहींचे रूट चेंज

    रद्द झालेल्या ट्रेन्सची नावे (ट्रेन नंबरसह)

    – ​22105 / 22106: CSMT – पुणे – CSMT इंद्रायणी एक्सप्रेस (Indrayani Express)

    – ​12169 / 12170: पुणे – सोलापूर – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस (Intercity Express)

    – ​12127 / 12128: CSMT – पुणे – CSMT इंटरसिटी एक्सप्रेस (Intercity Express)

    – ​11007 / 11008: CSMT – पुणे – CSMT डेक्कन एक्सप्रेस (Deccan Express)

    – ​12123 / 12124: CSMT – पुणे – CSMT डेक्कन क्वीन एक्सप्रेस (Deccan Queen Express)

    – ​12125 / 12126: CSMT – पुणे – CSMT प्रगती एक्सप्रेस (Pragati Express)

    – ​11009 / 11010: CSMT – पुणे – CSMT सिंहगड एक्सप्रेस (Sinhagad Express) (इमेजमध्ये फक्त ११MDEw नंबर आहे)

    – ​11011: CSMT – धुळे धुळे एक्सप्रेस (Dhule Express)

    – ​11012 (DHI – CSMT) JCO 06.07.2026: धुळे – मुंबई धुळे एक्सप्रेस (Dhule Express)

    – ​11009 (CSMT – PUNE) JCO 06.07.2026: मुंबई – पुणे सिंहगड एक्सप्रेस (Sinhagad Express)

     मार्ग बदललेल्या गाड्या (Diverted)

    – ​11049 (ADI – KOP) JCO 05.07.2026: अहमदाबाद – कोल्हापूर अहमदाबाद एक्सप्रेस (या गाड्याचा मार्ग बदलून कल्याण – इगतपुरी – मनमाड – दौंड कॉर्ड लाईन – पुणे असा करण्यात आला आहे).

    – ​22944 (INDB – DD) JCO 05.07.2026: इंदूर – दौंड दौंड एक्सप्रेस (मार्ग बदलून: कल्याण – इगतपुरी – मनमाड – दौंड).

    – ​12297 (ADI – PUNE) JCO 05.07.2026: अहमदाबाद – पुणे दुरंतो एक्सप्रेस (मार्ग बदलून: कल्याण – इगतपुरी – मनमाड – दौंड कॉर्ड लाईन – पुणे).

    -​22144 (BIDR – CSMT) JCO 05.07.2026: बिदर – मुंबई बिदर एक्सप्रेस (मार्ग बदलून: दौंड – मनमाड – इगतपुरी – कल्याण).

    – ​17614 (NED – PNVL) JCO 05.07.2026: नांदेड – पनवेल नांदेड एक्सप्रेस (मार्ग बदलून: दौंड – मनमाड – इगतपुरी – कल्याण).

    – ​20915 (LPI – INDB) JCO 05.07.2026: लिंगमपल्ली – इंदूर हमसफर एक्सप्रेस (मार्ग बदलून: दौंड – मनमाड – जळगाव – पाळधी – सुरत).

    – ​22160 (MAS – CSMT) JCO 05.07.2026: चेन्नई सेंट्रल – मुंबई चेन्नई एक्सप्रेस (Chennai Express)

    ​बदललेला मार्ग : ही गाडी दौंड (DD) – अंकाई (ANK) – मनमाड (MMR) – इगतपुरी (IGP) – कल्याण (KYN) मार्गे धावेल.

    – ​11014 (CBE – LTT) JCO 05.07.2026: कोईमतूर – लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला एक्सप्रेस / कोईमतूर एक्सप्रेस (Coimbatore Express)

    ​बदललेला मार्ग : ही गाडी दौंड (DD) – अंकाई (ANK) – मनमाड (MMR) – इगतपुरी (IGP) – कल्याण (KYN) मार्गे धावेल.

    – ​12164 (MAS – LTT) JCO 05.07.2026: चेन्नई सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस चेन्नई – एलटीटी सुपरफास्ट एक्सप्रेस (Chennai – LTT SF Express)

    ​बदललेला मार्ग : ही गाडी दौंड (DD) – अंकाई (ANK) – मनमाड (MMR) – इगतपुरी (IGP) – कल्याण (KYN) मार्गे धावेल.

    अर्धवट अंतरावर थांबवलेल्या गाड्या (Short Terminate)

    – ​20822 (SRC – PUNE) JCO 04.07.2026: संत्रागाछी – पुणे हमसफर एक्सप्रेस – ही गाडी पुणे ऐवजी पनवेल येथेच थांबवली जाईल.

    – ​12116 (SUR – CSMT) JCO 05.07.2026: सोलापूर – मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेस – ही गाडी मुंबई ऐवजी पुणे येथेच थांबवली जाईल (पुढील प्रवासासाठी पुणे येथून लिंक ट्रेन ११३०१ उपलब्ध असेल).

    – 22731 (HYB – CSMT) JCO 05.07.2026: हैदराबाद – मुंबई हुसेन सागर एक्सप्रेस (Hussain Sagar Express)
    ​ही गाडी मुंबई ऐवजी पुणे स्थानकावरच थांबवली जाईल (Short Terminated) आणि पुण्यातून हीच गाडी पुढे ‘१२७०१’ म्हणून चालवली जाईल.

    – ​12701 (CSMT – HYB) JCO 06.07.2026: मुंबई – हैदराबाद हुसेन सागर एक्सप्रेस (Hussain Sagar Express)
    ​ही गाडी मुंबई ऐवजी पुणे स्थानकावरूनच हैदराबादसाठी सुटेल (Short Originate).

    – ​22226 (SUR – CSMT) JCO 06.07.2026: सोलापूर – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस (Solapur – Mumbai Vande Bharat Express)
    ​ही गाडी मुंबई ऐवजी पुणे स्थानकावरच थांबवली जाईल (Short Terminated) आणि पुण्यातून हीच गाडी पुढे ‘२२२२५’ म्हणून चालवली जाईल.

    – ​22225 (CSMT – SUR) JCO 06.07.2026: मुंबई – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस (Mumbai – Solapur Vande Bharat Express)
    ​ही गाडी मुंबई ऐवजी पुणे स्थानकावरूनच सोलापूरसाठी सुटेल (Short Originate).

    बदललेल्या ठिकाणाहून सुटणाऱ्या गाड्या (Short Originate)

    – ​20821 (PUNE – SRC) JCO 06.07.2026: पुणे – संत्रागाछी हमसफर एक्सप्रेस – ही गाडी पुणे ऐवजी पनवेल येथून सुटेल.

    – ​11301 (CSMT – SBC) JCO 06.07.2026: मुंबई – बेंगळुरू उद्यान एक्सप्रेस – ही गाडी मुंबई ऐवजी पुणे येथून सुटेल.

    वेळेत बदल झालेल्या गाड्या (Rescheduled)

    – ​18520 (LTT – VSKP) JCO 06.07.2026: लोकमान्य टिळक टर्मिनस – विशाखापट्टणम एलटीटी एक्सप्रेस – ही गाडी सकाळी ०६:५५ ऐवजी सकाळी ०९:५५ वाजता सुटेल.

    – ​11029 (CSMT – KOP) JCO 06.07.2026: मुंबई – कोल्हापूर कोयना एक्सप्रेस – ही गाडी सकाळी ०८:४० ऐवजी सकाळी ११:४० वाजता सुटेल.

    – 20705 (NED – CSMT) JCO 06.07.2026: जालना / नांदेड – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस (Jalna – Mumbai Vande Bharat Express)
    ​या गाडीचा रॅक (Rake) मुंबई – नांदेड वंदे भारत एक्सप्रेस (20706) साठी वापरला जाईल.

    – ​20706 (CSMT – NED) JCO 06.07.2026: मुंबई – जालना / नांदेड वंदे भारत एक्सप्रेस (Mumbai – Jalna Vande Bharat Express) ​या गाडीच्या वेळेत २ तासांचा बदल करण्यात आला आहे. ही गाडी तिच्या मूळ वेळेनुसार दुपारी १३:१५ वाजता सुटण्याऐवजी आता दुपारी १५:१५ वाजता सुटेल.

follow us