EPF Withdrawal Rules : पीएफ काढण्याच्या नियमांत मोठा बदल; आता वयाच्या 55 वर्षांपूर्वी किती रक्कम काढता येणार ?

EPF Withdrawal Rules 2026: EPFO ने पीएफ काढण्याच्या नियमांत बदल केला आहे. आता पात्र सभासदांना 90 टक्क्यांपर्यंत पीएफ काढता येणार असून प्रतीक्षा कालावधी 12 महिन्यांवरून 2 महिने करण्यात आला आहे.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
EPF Withdrawal Rules

EPF Withdrawal Rules 2026 : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ (Provident Fund) खात्यातून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केलेत. या नव्या नियमांनुसार आता वयाची 55 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीही पात्र सभासदांना त्यांच्या पीएफ खात्यातील 90 टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा 75 टक्के होती. त्यामुळे आर्थिक अडचणीच्या काळात नोकरदारांना आपल्या पीएफमधील बचतीचा अधिक वापर करता येणार आहे.

बेरोजगारीच्या परिस्थितीत पीएफमधून पैसे काढण्यासाठी लागणारा प्रतीक्षा कालावधीही कमी करण्यात आला आहे. यापूर्वी पीएफ 12 महिन्यांची अट होती. मात्र, नव्या नियमांनुसार हा कालावधी कमी करून अवघ्या दोन महिन्यांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे नोकरी गेल्यानंतर आर्थिक गरजांसाठी पीएफमधील रक्कम उपलब्ध होण्याचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे. या बदलांमुळे पीएफ खातेदारांना गरजेच्या वेळी अधिक रक्कम आणि कमी वेळेत उपलब्ध होऊ शकणार आहे. मात्र, निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेचा विचार करून संपूर्ण पीएफ रक्कम काढून घेता येणार नाही, अशी तरतूदही नव्या नियमांमध्ये कायम ठेवण्यात आली आहे.

कोणत्या कारणांसाठी पीएफमधून पैसे काढता येणार?
पीएफ योजनेअंतर्गत सदस्यांना विविध आर्थिक गरजांसाठी खात्यातील रक्कम अंशतः काढण्याची परवानगी आहे. यामध्ये प्रामुख्याने पुढील कारणांचा समावेश होतो.

1. वैद्यकीय उपचार : स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या आजारपणासाठी आणि वैद्यकीय उपचारांच्या खर्चासाठी पीएफमधून पैसे काढता येतात.

2. शिक्षण : स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चाकरिता पीएफची रक्कम काढण्याची सुविधा आहे.

3. विवाह : स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या विवाहासाठी पीएफमधील पैसे वापरता येतात.

4. घर खरेदी आणि बांधकाम : घर किंवा फ्लॅट खरेदी करणे, घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करणे, घराचे बांधकाम करणे, गृहकर्जाची परतफेड करणे तसेच घराची दुरुस्ती किंवा नूतनीकरण करण्यासाठी पीएफमधून पैसे काढता येतात.

5. विशेष परिस्थिती : काही विशेष आर्थिक किंवा वैयक्तिक परिस्थितींमध्येही लागू असलेल्या अटींच्या अधीन राहून पीएफमधून पैसे काढण्याची परवानगी दिली जाते.

EPF Scheme 2026 मध्ये काय बदलले?
EPF Scheme 2026 अंतर्गत पीएफमधून अंशतः पैसे काढण्याच्या तरतुदींचे तीन प्रमुख गट करण्यात आले आहेत. यामध्ये अत्यावश्यक गरजा, घरासंबंधी गरजा आणि विशेष परिस्थिती यांचा समावेश आहे. या तीन श्रेणींनुसार पात्र सभासदांना त्यांच्या खात्यातील उपलब्ध रकमेवर लागू असलेल्या अटी आणि पैसे काढण्याच्या मर्यादेनुसार रक्कम काढता येणार आहे. तसेच, किती वेळा पैसे काढता येतील, यासाठीही निर्धारित मर्यादा लागू असतील.

follow us