युतीचा धर्म फक्त भाजपानेचं पाळावा का? तुम्ही बोलू नका आम्ही बोलणार नाही; चव्हाणांचा अजित पवारांना सल्ला
BJP आणि राष्ट्रवादी पुण्यामध्ये एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यात रवींद्र चव्हाण यांनी अहिल्यानगरमध्ये एकदा अजित पवारांना सुनावले आहे.
BJP State President Ravindra Chavhan on Ajit Pawar : राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार सुरू आहे. त्यामध्ये काही ठिकाणी भाजप– राष्ट्रवादी युती आहे. तर काही ठिकाणी ही युती तुटलेली आहे. अशा ठिकाणी भाजप-राष्ट्रवादी एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यामध्ये पुण्यामध्ये एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेल्या भाजप अन् अजित पवारांनी एकमेकांवर जोरदार टीका केली आहे. त्यात आता भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा अजित पवारांना सुनावले आहे.
काय म्हणाले रविंद्र चव्हाण?
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात झालेल्या आरोप प्रत्यरोपानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मीटकरी यांनी चव्हाण यांनी युतीचा धर्म पाळण्याचा उत्तर दिलं होत त्यावर उत्तर देताना रवींद्र चव्हाण यांनी अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा कडक शब्दांत सल्ला दिला आहे. अजित पवारांनी दिलेल्या उत्तराला माझं प्रतिउत्तर होत आदल्या दिवशी ते म्हणाले म्हणून मी म्हणालो त्यामुळे महायुतीचा धर्म फक्त भाजपानेचं पाळावा असं नाही त्यामुळे त्यांनी तसं बोलू नये आम्ही बोलणार नाही असा जणू इशाराच रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.
विकास हाच आमचा अजेंडा; रामभाऊ दाभाडेंनी मतदारांना दिला विश्वास
दरम्यान पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीवरील उमेदवारांवरून अजित पवारांवर भाजपच्या रविंद्र चव्हाणांसह मुरलीधर मोहोळांनी टीका केली होती ते म्हणाले होते की, अजित पवार यांना सोबत घेत असताना मी देवेंद्र फडणवीस यांना, ‘पुन्हा एकदा विचार करा’, असा सल्ला दिला होता. ही सर्व मंडळी कशा पद्धतीने आपल्यासोबत जोडली गेली आहेत, हे सर्वांना माहिती आहे. मी त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांना खासगीत नेहमी सांगायचो, ‘साहेब थोडा विचार करा.’ पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे कार्यकर्ते मला रोज सांगत आहेत. त्यामुळे थोडासा विचार करा, असे मी त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना बोललो होतो, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं.
