T-20 World Cup: दक्षिण आफ्रिकेपुढं भारताच्या वाट्याला पराभव, सेमीफायनलची वाट बिकट
टी-20 वर्ल्डकपमधील (T-20 World Cup) सुपर आठमधील भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात भारताचा पराभव.
India VS South Africa: टी-20 वर्ल्डकपमधील (T-20 World Cup) सुपर आठमधील भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 76 धावांनी धुव्वा उडवला. या पराभवासोबतच भारताची सेमीफायनलची वाट बिकट झाली असल्याचं चित्र आहे.
दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना टीम इंडियाची एकदम खराब सुरुवात झाली. आतापर्यंत स्फोटक फलंदाजी करणारा इशान किशन भोपळा फोडू शकला नाही. तर अभिषेक शर्माही पंधरा धावा करून बाद झाला. तिलक वर्माही एक धावेवर बाद झाला. वॉशिंग्टन सुंदर 11 धावांवर बाद झाला. एक बाजूने सूर्यकुमार यादवने लावू धरली असून तो पंधरा धावावर खेळत आहे.
डेव्हिड मिलर, स्टब्सनेही भारतीय गोलंदाजी फोडून काढली
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करमने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण जसप्रीत बुमराहने क्विंटन डी कॉकचा त्रिफळा उडवून टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर अर्शदीप सिंगूने मार्करमला चार धावांवर बाद केले. रायन रेक्लेटनला बुमराहने बाद केले. आफ्रिकेचे तीन फलंदाज अवघ्या वीस धावांत बाद झाले होते. परंतु त्यानंतर डेव्हिड मिलर आणि डेवाल्ड ब्रेव्हिसने (45) 97 धावांची मजबूत भागीदारी केली. मिलरने सर्वाधिक 63 धावा कुटल्या. त्यात सात चौकार आणि तीन षटकाराचा समावेश आहे. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्सनेही नाबाद 44 धावांची खेळी केली. त्याने हार्दिक पंड्याचे शेवटचे षटक फोडून काढले. हार्दिकच्या त्या षटकात 20 धावा गेल्या. दक्षिण आफ्रिकेने सात बाद 187 अशी मोठी धावसंख्या उभारली. जसप्रीत बुमराहने 4 षटकात फक्त 15 धावा देत तीन विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंगने दोन विकेट्स घेतल्या.
वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबेची धुलाई
फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती या सामन्यात अपयशी ठरला. त्याने चार षटकात तब्बल 47 धावा दिल्या. त्याने डेव्हिड मिलरची विकेट घेतली. तर शिवम दुबेने 2 षटकात 32 धावा दिल्या. तर एक विकेट घेतली.
