T 20 World Cup Final: संजू, अभिषेक, इशानची वादळी नाही, तर त्सुनामी खेळी ! न्यूझीलंडसमोर 256 धावांचे ‘टार्गेट’

India VS New Zealand-सलामीवीर संजू सॅमसनने 89 , इशान किशनने 54 आणि अभिषेक शर्माने 52 धावांची स्फोटक खेळी केली.

  • Written By: Published:
Abhishek Sharma

India VS New Zealand: टी-20 वर्ल्डकपच्या (T 20 World Cup Final) फायनलमध्ये भारतीय फलंदाजांनी अहमदाबादच्या मैदानावर चौकार, षटकारांचा पाऊस पाडत न्यूझीलंडसमोर 255  धावांचा डोंगर उभा केलाय. सलामीवीर संजू सॅमसनने 89 , इशान किशनने 54 आणि अभिषेक शर्माने 52 धावांची स्फोटक खेळी केली. न्यूझीलंडकडून जिमी निशमने तीन विकेट घेतल्या. पण अखेरच्या षटकात त्याची धुलाई झाली. वर्ल्डकपच्या इतिहासात फायनलमधील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाने स्फोटक सुरुवात केली. आतापर्यंत अपयशी ठरलेल्या अभिषेक शर्मा व संजू सॅमसनने न्यूझीलंडची गोलंदाजी फोडून काढत चौकार, षटकारांचा पाऊस पाडला. त्यामुळे सहा षटकांत 92 धावा झाल्या. अभिषेक शर्माने अवघ्या 18 चेंडूत तुफानी अर्धशतक झळकविले. अभिषेकने 21 चेंडूत 52 धावा काढल्या. त्यात 6 चौकार आणी तीन षटकारांचा समावेश आहे. सलामीच्या जोडीने 98 धावांची भक्कम भागिदारी केली.

संजू सॅमसनची 89 धावांची स्फोटक खेळी

त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला आलेल्या इशान किशनने संजू सॅमसनला साथ देत जोरदार फटकेबाजी केली. इशान किशनने 23 चेंडूत अर्धशतक झळकविले आहे. संजू सॅमसनने 46 चेंडूत 89 धावांची स्फोटक खेली केली. त्यात आठ षटकार आणि पाच चौकारांचा समावेश आहे. तो मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. तिघांच्या स्फोटक फलंदाजीमुळे टीम इंडियाने 16 व्या षटकात 200 धावांचा टप्पा ओलांडला. पण फटकेबाजी करताना इशान किशन 54 धावांवर बाद झाला. त्याने 25 चेंडू चार चौकार आणि चार षटकार मारले.


जिमी निशमने धक्के दिले पण दुबेने फोडून काढलं.

त्यानंतर सूर्यकुमार यादवही खाते न उघडताच झेलबाद झाला. जिमी निशमने 16 व्या षटकात संजू, इशान, सूर्यकुमार यादवला झेलबाद करत तीन झटके दिले. त्यामुळे धावगतीला ब्रेक लागला.पण शिवम दुबेने जिमी निशमचे शेवटचे षटक फोडून काढलं. शिमने आठ चेंडूत 26 धावा कुटल्या. त्यात त्याने तीन चौकार आणि दोन षटकार मारले.

 

follow us