ऋतुराज अन् विराटची शतकी खेळी व्यर्थ; दक्षिण आफ्रिकेकडून टीम इंडियाचा पराभव

दक्षिण आफ्रिकेची परदेशात एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची पहिली वेळ ठरली.

  • Written By: Published:
News Photo   2025 12 03T224901.670

रायपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात (IND vs SA) दक्षिण आफ्रिकेने विक्रमी धावांचा यशस्वी पाठलाग करून विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 359 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 6 विकेट्सच्या मोबदल्यात 4 बॉलआधी पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकने 49.2 ओव्हरमध्ये 362 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेची परदेशात एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची पहिली वेळ ठरली.

दक्षिण आफ्रिकेने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. तर टीम इंडियाची 350 पेक्षा अधिक धावा करुनही पराभव होण्याची दुसरी वेळ ठरली. भारताच्या या पराभवामुळे ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली या दोघांची शतकी खेळी व्यर्थ ठरली.

बीसीसीआयकडून टी 20I मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला संधी कुणाला डच्चू?

त्याचबरोबर कॉर्बिन बॉश आणि केशव महाराज या जोडीने अखेरच्या क्षणी निर्णायक भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात योगदान दिलं. कॉर्बिनने नॉट आऊट 26 तर केशवने नाबाद 10 धावा केल्या. तर टीम इंडियाचे गोलंदाज 358 धावांचा यशस्वी बचाव करण्यात अपयशी ठरले.

अर्शदीप सिंह आणि प्रसिध कृष्णा या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर हर्षित राणा आणि कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही.

follow us