विकास हाच आमचा अजेंडा; रामभाऊ दाभाडेंनी मतदारांना दिला विश्वास

पुणे पालिकेत समावेशापूर्वी व नंतर वाघोलीतील विविध विकासकामांसाठी रामभाऊ दाभाडे व सातव यांनी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला होता.

  • Written By: Published:
विकास हाच आमचा अजेंडा; रामभाऊ दाभाडेंनी मतदारांना दिला विश्वास

वाघोली : विकास हाच आमचा अजेंडा असल्याचा विश्वास प्रभाग क्रमांक 3 चे भाजपचे उमेदवार रामभाऊ दाभाडे यांनी मतदारांना दिला आहे. ते पुणे महानगरपालिकेच्या लोहगाव, विमाननगर, सोमनाथनगर व वाघोली प्रभाग क्रमांक 3 मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार शुभारंभप्रसंगी बोलत होते. यावेळी दाभाडे यांनी आम्ही कोणावरही विनाकारण टीका करीत नाही. मात्र जाणीवपूर्वक, हेतूपुरस्सर टीका करणाऱ्यांना सोडणार नाही, असा ठाम इशाराही दाभाडे यांनी दिला आहे.

जनतेसमोर स्पष्ट जाहीरनामा मांडूनच भाजप निवडणूक लढवत असल्याचं प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याकडून स्पष्ट

पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार रामदास दत्तात्रेय दाभाडे, अनिल दिलीप सातव, ऐश्वर्या सुरेंद्र पठारे व श्रेयस प्रीतम खांदवे यांनी संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन नारळ फोडत प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला.
नागरिकांचा विश्वास हाच भाजपचा खरा विजयाचा आधार आहे, असे सांगत उमेदवारांनी मतदारांचे आशीर्वाद घेतले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

पुणे महानगरपालिकेत समावेश होण्यापूर्वी व नंतर वाघोलीतील विविध विकासकामांसाठी रामभाऊ दाभाडे व अनिल सातव यांनी सातत्याने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला होता. त्याच धर्तीवर लोहगाव, सोमनाथनगर व विमाननगर परिसरातही ऐश्वर्या पठारे, सुरेंद्र पठारे, प्रीतम खांदवे, श्रेयस खांदवे, रामभाऊ दाभाडे व अनिल सातव यांच्या माध्यमातून स्वखर्चाने तसेच प्रशासनाकडे पाठपुरावा करून अनेक विकासकामे मार्गी लागल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

Video : विरोधकांचं टेन्शन वाढलं; धीरज घाटेंनी पुण्यातील भाजपच्या विजयी जागांचा आकडाच सांगितला

आम्ही यापूर्वीही विकासकामे करून दाखवली आहे. आणि यापुढील काळात लोहगाव, विमाननगर, सोमनाथनगर व वाघोली परिसराचा विकास वेगाने करण्यात येईल. नागरिकांनी केलेल्या अपेक्षा पूर्ण करणे हेच आमचे ध्येय आहे. टीका करण्याऐवजी संवाद साधावा. मात्र विनाकारण टीका करणाऱ्यांना योग्य उत्तर दिले जाईल असे रामभाऊ दाभाडे यांनी सांगितले.

follow us