पुण्यात प्रचाराच्या धामधूमीत खळबळ; भाजप उमेदवार गणेश बिडकरांवर हल्ल्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल…

Ganesh Bidkar पुणे महापालिकेची निवडणुकीत १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. शहरातील ४१ प्रभागांमधील १६५ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

  • Written By: Published:
पुण्यात प्रचाराच्या धामधूमीत खळबळ; भाजप उमेदवार गणेश बिडकरांवर हल्ल्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल…

Attempt To Attack On Pune Bjp Candidate Ganesh Bidkar : महानगर पालिकांच्या निवडणुकांसाठी प्रचार शिगेला पोहचलेला असताना पुण्यात भाजप उमेदवार गणेश बिडकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवार पेठेत हा धक्कादायक प्रकार समोर आला असून, याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आदित्य दीपक कांबळे (वय २४, रा. सदानंदनगर, मंगळवार पेठ) याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली असून, निनाद धेंडे, संजय भिमाले, प्रदीप कांबळे, भरत शिंदे आणि सागर कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Video : चुका दाखवल्या म्हणजे युती धर्म मोडला का?, अजित पवारांचा पुन्हा भाजपवर वार

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार पेठेतील भीममगर परिसरात रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी नीलेश आल्हाट यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि. 10) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निलेश आल्हाट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मंगळवार पेठेत थांबले होते. याचवेळी भाजप आणि आरपीआयचे कार्यकर्तेही शुभेच्छा देण्यासाठी आल्याने परिसरात गर्दी झाली. त्यावेळी या गर्दीचा फायदा घेत आरोपींनी प्रभाग क्रमांक २४ मधील भाजपच्या सर्व उमेदवारांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच आरोपी सागर कांबळे याने गणेश बिडकर यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

पुणे महापालिकेत भाजपला किती जागा मिळणार? गणेश बिडकरांनी थेट आकडाच सांगितला

पुणे महापालिकेची निवडणुकीत १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. शहरातील ४१ प्रभागांमधील १६५ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. निवडणुकीत ११५५ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी चार हजार ११ मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून, त्यापैकी ९०६ मतदान केंद्र संवेदनशील आहे. या संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.. मतदान केंद्रांवर बंदोबस्तासाठी चार हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहे.

follow us