पुणे महापालिकेत भाजपला किती जागा मिळणार? गणेश बिडकरांनी थेट आकडाच सांगितला

Ganesh Bidkar On Pune Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संपूर्ण राज्याचे

  • Written By: Published:
Ganesh Bidkar On Pune Election

Ganesh Bidkar On Pune Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष पुणे महापालिकेवर लागले आहे. भाजपविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटादरम्यान यंदा मुख्य लढत पाहायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासाठी तयारी दर्शवल्याने यंदा पुणे महापालिकेसाठी होत असलेल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच पुण्यातील भाजप नेते आणि पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांनी लेट्सअप मराठीला (Letsupp Marathi) विशेष मुलाखत देत निवडणुकीसाठी भाजपची प्लॅनिंग सांगत भाजप या निवडणुकीत 120 पेक्षा जास्त जागांवर विजयी होणार असा दावा देखील त्यांनी या मुलाखतीमध्ये केला आहे.

लेट्सअप मराठीला दिलेल्या या विशेष मुलाखतीमध्ये गणेश बिडकर यांना पुणे महापालिकेत यंदा भाजप किती जागा मिळवणार असा प्रश्न विचारला असता गणेश बिडकर म्हणाले की, 2017 मध्ये आम्हाला 97  जागा मिळाले होते. आम्ही पाच वर्षात खूप चागलं काम केले आहे. तर आता आणखी पाच-सहा शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आमची संख्या आता 103-104 झाली आहे. आमच्याकडे देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आहे. मोदींचा चेहरा आहे. शहरात मुरलीधर मोहोळ सारखा नेता आहे. तसेच चंद्रकांत पाटील सारखे आमचे पालक आहेत. माधुरी वहिनी आहे. धीरजजी असेल आमच्या अखी भारतीय जनता पार्टीची एक फळी आहे. पण विरोधी पक्षात तसं नाही. तिकडे तट आहेत. त्यामुळे आम्ही 103 वरुन 123 झाले नाही तर हे आमचा अपयश असेल. आम्ही या निवडणुकीत 120 किंवा 125 पेक्षा जास्त जागा जिंकणार असं गणेश बिडकर म्हणाले.

तसेच विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्याने विरोध आमच्यावर यंत्रणे हायजॅकचा आरोप करत आहे. जर आम्ही यंत्रणे हायजॅक केली असती तर उरलेल्या जागा देखील आम्ही विरोधकांसाठी का? सोडल्या असत्या असं म्हणत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तर दुसरीकडे पुणे महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

ठाकरे बंधू मुंबईनंतर ‘या’ चार महापालिकेत एकत्र येणार; लवकरच होणार मोठी घोषणा

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मैत्रीपुर्ण लढत होणार असून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुणे महापालिकेसाठी युती करणार असल्याचे संकेत मिळत आहे. तर ठाकरे बंधू देखील या निवडणुकीसाठी युती करणार असल्याने यंदा पुणे महापालिकेत कोणाचा महापौर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

follow us