Sunetra Pawar : दादांच्या राष्ट्रवादीत ‘सुनेत्रा’ युगाची सुरूवात; राज्याला मिळाली पहिली महिला उपमुख्यमंत्री
सुनेत्रा अजित पवार यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३, धाराशिवच्या तेर येथे झाला. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार राहिल्या आहेत.
Sunetra Pawar Takes Oath As Deputy CM Of Maharashtra : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आज (दि.31) सुनेत्रा पवार यांना राज्याच्या 17 व्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. त्यांच्या या शपथविधीनंतर राज्याला सुनेत्रा पवार यांच्या रूपाने पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत. शपथविधी सोहळ्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांना लोकभवन येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाच्या गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्याला पवार कुटुंबियांकडून फक्त पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि कॅबिनेटमधील मंत्री उपस्थित होते. शपथग्रहण करताना सभागृहात उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अजित पवार अमर रहे तसेच एकच वादा अजितदादा अशा घोषणा दिल्या.
सुनेत्रा पवारांची एकमताने गटनेतेपदी निवड पण, ठरावाच्या पत्रावर तीन आमदारांच्या सह्याचं नाही
अजित पवारांच्या उत्तराधिकारी; सुनेत्रा पवारांचं कुटुंब, शिक्षण अन् राजकीय कारकीर्द
सुनेत्रा अजित पवार यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३, धाराशिव/उस्मानाबादच्या तेर येथे झाला. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार राहिल्या आहेत. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून ३१ जानेवारी रोजी त्यांनी शपथ घेतली आहे. दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी म्हणून त्या ओळखल्या जातातच, मात्र त्यांना राजकीय वारसा हा त्यांच्या लग्नाआधीपासूनच लाभला आहे. त्यांचे वडील बाजाराव पाटील हे धाराशीवच्या स्थानीक राजकारणात सक्रीय होते. त्याच बरोबर त्यांचे भाऊ पद्मसिंह पाटील हे माजी राज्य मंत्री आणि लोकसभेचे खासदार राहिले आहेत. याच पद्मसिंह पाटीलांचे पुत्र म्हणजे राणा जगजीतसिंह पाटील हे त्यांचे भाचे आहेत, जे सध्या आमदार आहेत. असा धाराशीवच्या राजकारणावर प्रगल्भ पकड राहिलेल्या परिवारातून त्या येतात. Sunetra Pawar Takes Oath As Deputy CM Of Maharashtra
Video : कहानी में ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण लटकणार?, भुजबळांनी पवारांचा दावा फेटाळला
महाराष्ट्रात, अजित पवारांचे समर्थक त्यांना “दादा” म्हणत, तर सुनेत्रा पवार यांनी लोकं प्रेमाने “वाहिनी” म्हणून संबोधतात. १९८५ मध्ये त्यांचं अजित पवारांशी लग्न झालं. या लग्नानंतर त्या पवार कुटुंबात आल्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, सुनेत्रा पवार यांचा जन्म ऑक्टोबर १९६३ मध्ये झाला. त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील एसबी कॉलेजमधून बी.कॉम.ची पदवी मिळवली.
त्यांनी शेती, उद्योग आणि सामाजिक कार्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्क या एका मोठ्या औद्योगिक उपक्रमाचे नेतृत्व केले. सुनेत्रा पवार या बारामतीतील २५,००० हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त देखील आहेत. २०१० मध्ये, त्यांनी पर्यावरणाचे रक्षणच्या दृष्टीने एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाची स्थापना केली आणि त्याद्वारे काटेवाडी गावाचं देशातील पहिलं इको-व्हिलेजमध्ये रूपांतर केले.
VIDEO | Mumbai: Sunetra Pawar (@SunetraA_Pawar) takes oath as Maharashtra Deputy CM, at Lok Bhavan.#Maharashtra
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/Epyjl5ubT5
— Press Trust of India (@PTI_News) January 31, 2026
२०२४ मध्ये, सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत पहिल्यांदाच सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यांचा सामना सुप्रिया सुळे यांच्याशी झाला आणि त्या निवडणुकीत त्यांना दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव पत्करावा लागला. काही महिन्यांनंतर, त्यांचे पती अजित पवार यांनी इतर अनेक उमेदवारांना मागे टाकत त्यांना राज्यसभेवर निवडून आणलं. सुनेत्रा पवार या ६२ वर्षांच्या आहेत आणि आता अजित दादांच्या अचानक झालेल्या निधनानंतर त्या महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. विधीमंडळातील पक्षाच्या गटनेत्या आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्या आता काम पाहणार आहेत.
शपथग्रहण सोहळ्यापूर्वी पवारांचे गौप्यस्फोट
सुनेत्रा पवार यांच्या शपथग्रहण सोहळ्यापूर्वी सकाळी शरद पवारांनी पत्रकार परिषदेत अनेक खुलासे केले. माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की, “अजित पवार हे कर्तृत्ववान नेते होते. अशा कर्तृत्ववान व्यक्तीचे जाणे हा केवळ कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठा आघात आहे. आज ते हयात असते, तर ते घरी बसले नसते; ते फिल्डवरच काम करत असते.” अजित पवारांनी अनेक वर्षे संघटना मजबूत ठेवण्यासोबतच सामान्य जनतेशी थेट संवाद साधत काम केल्याचे शरद पवार यांनी नमूद केले. “लोकांच्या प्रश्नांची माहिती घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न अजित नेहमी करत असे. कामात त्याने कधीही कमतरता ठेवली नाही,” असेही ते म्हणाले.
सुनेत्रा पवार महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; पण देशात कितवा नंबर ?
या दुःखद परिस्थितीला सामोरे जाताना पुढील पिढीवर मोठी जबाबदारी असल्याचे सांगत शरद पवार म्हणाले, “लोकांचे दुःख कमी करण्यासाठी आपल्याला अधिक काम करावे लागेल. नव्या पिढीची जबाबदारी आता अधिक आहे.” दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत विचारले असता शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “सुनेत्रा पवार शपथ घेणार असतील, तर तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. पटेल आणि तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. याबाबत माझ्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही,” असे त्यांनी सांगितले. मुंबईत कुठे चर्चा झाली असेल, पण आमच्याकडे त्याबाबत कोणतीही माहिती नाही. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असून, त्यावर मी भाष्य करणार नाही,” असे स्पष्ट करत शरद पवारांनी चर्चांना पूर्णविराम दिला.
