पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भाजपच्या गटनेते पदी प्रशांत शितोळे यांची निवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपला दुसऱ्यांदा एकहाती सत्ता मिळाली आहे. भाजपचे सर्वाधिक ८४ नगरसेवक निवडून आले.

  • Written By: Published:
News Photo   2026 01 31T163400.688

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या गटनेतेपदी प्रशांत शितोळे (Pune) यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. भाजपचा गटनेता हा सभागृहाचा नेता असणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपला दुसऱ्यांदा एकहाती सत्ता मिळाली आहे. भाजपचे सर्वाधिक ८४ नगरसेवक निवडून आले. प्रशांत शितोळे हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. सांगवी गावठाण प्रभाग ३२ मधून तीनवेळा नगरसेवक निवडून आले होते. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे.

सुनेत्रा पवारांची एकमताने गटनेतेपदी निवड पण, ठरावाच्या पत्रावर तीन आमदारांच्या सह्याचं नाही

महापालिका निवडणुकीपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांची ही चौथी टर्म आहे. शितोळे हे भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे मित्र आहेत. भाजपने शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयात गटाची नोंदणी केली. भाजपचा गट नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची नियुक्ती केली असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपचे 84, राष्ट्रवादी काँग्रेसचे 36 आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत.

Tags

follow us