शरद पवार सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला हजर राहणार? पार्थ पवारांचा मनधरणीचा प्रयत्न
Parth Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतर आज सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. या शपथविधीसाठी
Parth Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतर आज सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. या शपथविधीसाठी राजभवानामध्ये जोरदार तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. माहितीनुसार, आज संध्याकाळी 5.30 वाजत सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. तर दुसरीकडे या शपथविधीबाबत मला काहीच माहिती नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) शपथ घेणार असतील, तर तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. पटेल आणि तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. याबाबत माझ्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही असं पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले.
तर सुनेत्रा पवार शरद पवार किंवा पवार कुटुंबातील इतर सदस्यांसोबत कोणतीही राजकीय चर्चा न करता मुंबईत दखल झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु झाल्यानंतर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) गोविंद बागेत शरद पवार यांच्या मनधरणीसाठी दाखल झाले होते. तर आता समोर आलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पार्थ पवार यांनी शरद पवार यांना आज संध्याकाळी 5.30 होणाऱ्या शपथविधीला हजर राहण्याचे आमंत्रण दिले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चानंतर आता शरद पवार सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला हजर राहणार का? याबाबत सध्या अनेक चर्चांना उधाण आले आहे.
मोठी बातमी! सुनेत्रा पवार देणार राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा
अजित पवार यांच्या निधनानंतर 30 जानेवारी सुनेत्रा पवार यांची पार्थ पवार, जय पवार आणि सुनिल अरोरा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी होकार दिला आहे. पुढील काही मिनिटांमध्ये त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवड होणार असून यानंतर सुनेत्रा पवार राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
