अजितदादांच्या विमान अपघाताची विधिमंडळात चर्चा करा; रोहित पवार आक्रमक थेट पत्रच दिले
Rohit Pawar- विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन अजितदादांच्या विमान अपघाताचा विषय विधिमंडळात चर्चेला घेऊन विस्तृत चर्चा करण्याची मागणी रोहित पवारांनी अध्यक्षांकडे केली.
Rohit Pawar Letter to Rahul Narvekar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघात मृत्यूप्रकरणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. अजित पवार यांच्या अपघाताप्रकरणावर विधिमंडळात विस्तृत चर्चा करण्याची मागणी रोहित पवार यांनी केलीय. याबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना रोहित पवार यांनी पत्र दिलंय.
सहा वेळा राज्याचं उपमुख्यमंत्रिपद सांभाळलेल्या आणि 11 वेळा राज्याचं बजेट मांडलेल्या अजितदादांचा विमान अपघातात अकाली मृत्यू होऊनही या बाबीवर विधिमंडळात साधी चर्चाही होत नसेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळंच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन अजितदादांच्या विमान अपघाताचा विषय विधिमंडळात चर्चेला घेऊन विस्तृत चर्चा करण्याची मागणी रोहित पवारांनी अध्यक्षांकडे केली आहे.
रोहित पवार यांनी अध्यक्षांना दोन पत्र दिले आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत विस्तृत चर्चा करण्याची मागणी केली आहे. अजितदादांच्या अपघाताची सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी ही संपूर्ण राज्यभरातील जनतेची मागमी आहे. दादांच्या दुर्देवी अपघाताचा संदर्भात जनतेच्या मनात अनेक शंका आहेत. परंतु यासंदर्भात AAIB च्या प्राथमिक अहवालातून कोणत्याही शंकाचे निरसन झालेले नाही. सीआयडी करत असलेल्या तपासात देखील कुठलेही प्रगती दिसत नाही. तसेच राज्य शासनाने सीबीआय चौकशीसाठी केंद्राकडे मागणी करून जवळपास एक महिना होत आहे. केंद्र सरकारने कुठेलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अपघाताला दीड महिना उलटला तरी नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रण निर्माण होत आहे. त्यामुळे विधानसभेत विस्तृत चर्चा होणे गरडेचे असल्याची मागणी रोहित पवारांनी केलीय.
रोहित पवारांच्या अकरा मागण्या कोणत्या ?
रोहित पवारांनी आणखी एक पत्र विधानसभा अध्यक्षांना दिले आहे. त्यात अकरा प्रमुख मागण्या आहेत. या दुर्घटनेची तांत्रिक, तसेच क्रिमिनल अनुषंगाने तपास व्हावा, यासाठी कालबद्ध वेळेत सर्वंकक्ष, स्वतंत्र चौकशीचे आदेश द्यावे. तसेच या संदर्भात तत्काळ एफआयआर दाखल करून घ्यावा. विमानाचा मेनटेंस, सेफ्टी सिस्टिमची चर्चा करावी. फाइट ऑपरेशन आणि क्रू कॅम्पिलन्स या सर्व गोष्टींची चौकशी करावी. एटीसी ट्रान्सक्रिप्ट, सेंट्रल रिपोर्ट, फाइट रायडर डाटा, तसेच कॉकपिट व्हाइस रेकॉर्डिंगमधील विसंगतीची पडताळणी करावी. रनवे 11 ची निवड, दृश्यमानता पर्यायी, विमानतळाचा वापर न करणे या निर्णयांची चौकशी करावी. 2023 मुंबई अपघातानंतर ऑपरेटरवर झालेल्या नियामक कारवाईतील त्रुटींची आढावा घ्यावा व दोषी आढळल्यास तत्काळ कायदेशीर कारवाई करावी. संवेदशनील नसलेली सर्व निष्कर्ष आमि माहिती सर्वच सर्व सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्यात यावेत. व्हीएसआर कंपनीच्या कम्पलाइन्स मध्ये त्रुटी असल्याचे डीजीसीएच्या ऑडिट रिपोर्टमध्ये पुढे आले आहे. व्हीएसआर आणि compliances मध्ये त्रुटी असल्याचे डीजीसीएच्या ऑडिट रिपोर्टमध्ये पुढे आहे. त्यामुळे व्हीएसआर कंपनी आणि डीजीसीएवर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा.
व्हीएसआर कंपनी तसेच अॅरो एअरक्रॉफ्ट सेल्स आणि चार्टर्स प्राइव्हेट लिमिटेड यांच्या सर्व विमानसेवा तत्काळ स्थगित करून, या कंपनीवर बंदी घालावी. सदरील व्हीएसआर कंपनीसोबत केंद्रीय विमान मंत्र्यांशी संबंधित कंपनीचे आर्थिक संबंध असल्याने या अपघाताची चौकशी प्रभावीत होण्याची शक्यता असल्याने तपास पूर्ण होऊपर्यंत नागरी विमान मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा. तपासासाठी एएआयबी व्यतिरिक्त बीईए (फ्रान्स) आणि एएआयबी (UK) सारख्या स्वतंत्र आंतरराष्ट्रीय तपास संस्थांचा समावेश करावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
