अजितदादा सुरक्षित नाही तर कुणीही नाही… सभागृहात अमित देशमुख कडाडले रोहित पवारांचाही दुजोरा
Ajit Pawar Plane Crash वर सभागृहात काँग्रेस आमदार अमित देशमुखांनी महाराष्ट्र शासनाने या संदर्भात सविस्तर निवेदन करावे अशी मागणी यावेळी केली.
Amit Deshmukh on Ajit Pawar Plane Crash in House Rohit Pawar Support : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन होऊन दीड महिना होत आला असला तरी, हा अपघात कशामुळे घडला आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची होती हे अद्याप कोणत्याही यंत्रणेने पुढे येऊन सांगितलेले नाही. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत यावर काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी राज्यातील सुरक्षा यंत्रणा असोत किंवा ज्या विभागामार्फत बारामती विमानतळाचे संचालन होते त्या MIDC आणि MADC हे कोणतेच विभाग या संदर्भाने पुढे येऊन काहीच भाष्य करत नाहीत ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगून महाराष्ट्र शासनाने या संदर्भात सविस्तर निवेदन करावे अशी मागणी यावेळी केली.
नेमकं काय म्हणाले अमित देशमुख?
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. त्यांचं अपघाती निधन झालं. जेव्हा ही बातमी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली. त्यावेळी त्यांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की, जर अजित दादा यांच्यासारखी व्यक्ती सुरक्षित नसतील तर कोणीही सुरक्षित नाहीये. ते जर राज्याचे उपमुख्यमंत्री होते. तर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची होती? राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी यावर मनोगत व्यक्त केलं, माहिती दिली. मात्र राज्याच्या मुख्य सचिवांनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
श्री.अमित देशमुख जी यांनी अजित दादांच्या अपघाताचा मुद्दा सभागृहात उपस्थित करून सरकारने स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. त्यांनी तांत्रिक बाबी उपस्थित करत सरकारला जाब विचारला आहे. या अधिवेशनातच या विषयी चर्चा घेऊन सरकार ठोस भूमिका मांडेल ही अपेक्षा आहे .@AmitV_Deshmukh… https://t.co/52aUsk2hnC
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 11, 2026
तुम्हाला IAS व्हायचयं? UPSC टॉपर्सच्या 6 सवयी ठरतात महामंत्र; फॉलो करणाऱ्यास यश नक्की!
ज्यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यपाल हे लोक विमानाने, हेलिकॉप्टरने प्रवास करतात, त्यासाठी काही नियम आणि राज्य शिष्टाचार आहेत, त्यावर राज्य शिष्टाचार विभागाच्या सचिवाने देखील काही भाष्य केलं नाही. या सर्व नियमावलीच्या योग्य अंमलबजावणी होते का? यावर सरकारने स्पष्टीकरण द्यावं. यावर तपास यंत्रणांनी देखील काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यानंतर विमानांच्या सुरक्षेवर काम केलं जाणार का? ते या अगोदरच्या घटनांनंतर केलं गेलं असतं तर अशा घटना टाळता येऊ शकल्या असत्या. तसेच तपास होत राहिलं. केंद्र सरकारकडे तो असल्याचं सांगितलं जाईल. मात्र त्यातून राज्य सरकार काही शिकणार की नाही. असा सवाल यावेळी देशमुख यांनी केला.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
अमित देशमुख जी यांनी अजित दादांच्या अपघाताचा मुद्दा सभागृहात उपस्थित करून सरकारने स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. त्यांनी तांत्रिक बाबी उपस्थित करत सरकारला जाब विचारला आहे. या अधिवेशनातच या विषयी चर्चा घेऊन सरकार ठोस भूमिका मांडेल ही अपेक्षा आहे.
