उन्नत महामार्गांसाठी अजितदादांचे सहकार्य; मंत्री नितीन गडकरींनी सांगितला ‘तो’ किस्सा

Nitin Gadkari On Ajit Pawar : पुण्यातील पुणे - शिरुर, हडपसर- यवत व तळेगाव- चाकण - शिक्रापूर या उन्नत महामार्गांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Nitin Gadkari On Ajit Pawar

Nitin Gadkari On Ajit Pawar : पुण्यातील पुणे – शिरुर, हडपसर- यवत व तळेगाव- चाकण – शिक्रापूर या उन्नत महामार्गांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या प्रकल्पांचे भूमिपूजन कार्यक्रम पार पडले आहे. या कामाला 18 हजार कोटींचा खर्च येणार आहे. पुढील चार वर्षात हे प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच या महामार्गांसाठी प्रत्येक रस्त्यावर प्रतिकिलोमीटर नऊ रुपयांप्रमाणे टोल आकारण्यात येणार आहे. कार्यक्रमादरम्यान बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिवंगत नेते अजितदादांची आठवण करत या प्रकल्पासाठी अजितदादांचा महत्त्वाचा वाटा असल्याची माहिती दिली आहे.

कार्यक्रमादरम्यान बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, देशातील सर्वात जास्त ट्रॅफिक जॅम असणाऱ्या शहरात पुण्याचा देखील नंबर लागतो. ट्रॅफिक जॅम असल्याने शहरात प्रदूषणाची देखील गंभीर समस्या निर्माण होते. पुणे (Pune) शहराचे जे मुख्य रस्ते आहे एक म्हणजे पुणे ते कोल्हापूर, पुणे ते सोलापूर, पुणे ते नाशिक आणि पुणे ते मुंबई या सर्व मार्गावर आता वाहातूकीचे रेकॉर्ड तुटले आहे. त्यामुळे येथे रस्ते वाढवण्यासाठी आता जागा देखील उपलब्ध नाही. जेव्हा मी महाराष्ट्राचा बांधकाम मंत्री होतो. त्यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे तयार करण्यात आला. तेव्हा बायपास तयार झाला त्यावेळी आम्ही पुणे शहराला जोडणारे चार- पाच रस्ते देखील एमएसआयडीच्या माध्यमातून तयार करुन घेतले होते. मात्र आता ट्रॉफिक खूप जास्त झाल्याने नवीन टेक्नोलॉजीचा वापर करुन तीन महत्त्वाच्या प्रकल्पाचा आज भूमिपूजन होत आहे. या प्रकल्पाच्या बाबतीत मी जी घोषणा केली होती ती आज पूर्ण होत आहे याबाबत मला अतिशय समाधान आहे.

त्यावेळेचे तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक विनंती केली होती. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारकडून काही मदत पाहिजे.  या प्रकल्पासाठी लागणारा सिमेट आणि स्टीलवरचा जीएसटी माफ करुन द्या अशी विनंती मी केली होती. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला मंत्रिमंडळातून मंजुरी दिली त्यामुळेच हा प्रकल्प आज आपण सुरु करतो आहे. पण आज या प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या वेळी अजितदादा नाही आहे याची मला खंत आहे कारण त्यांच्या सहकार्याशिवाय हा प्रकल्पपूर्ण झाला नसता.

ठाकरेंचा राम मंदिर लुटी विरोधात एल्गार म्हणून सोनम वांगचुक यांना दडपशाही मार्गाने अटक – संजय राऊत

पुणे – शिरुर, हडपसर- यवत व तळेगाव- चाकण – शिक्रापूर हे सर्व रस्ते ट्रॉफिकमुळे महत्त्वाच्या आहे. यामध्ये 53.40 किलोमीटर पुणे – शिरुर हा 7 हजार 515 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. हडपसर- यवत हा 31.65 किमीचा 5 हजार 265 कोटी रुपयांचा आहे आणि तळेगाव चाकण शिक्रापूर हा 53.20 किलोमीटर प्रकल्प 4 हजार कोटी रुपयांचा आहे. आज या तिन्ही प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होत आहे. असा प्रकल्प मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात देखील केला होता. तो आशियाचा पहिला प्रकल्प होता. पण आता तो तोडून पुढे जाणार आहे असं या कार्यक्रमादरम्यान बोलताना मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

follow us