ठाकरेंचा राम मंदिर लुटी विरोधात एल्गार म्हणून सोनम वांगचुक यांना दडपशाही मार्गाने अटक – संजय राऊत
Sanjay Raut : नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक
Sanjay Raut : नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते. आज त्यांच्या उपोषणाचा 20 वा दिवस असून आज सकाळी त्यांना दिल्ली पोलिसांकडून आंदोलन स्थळावरुन हटवण्यात आलं आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे आंदोलन स्थळावरुन त्यांना हटवल्यानंतर विरोधक मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे.
देश किती हुकूमशाही मार्गाने चालला आहे. सोनम वांगचुक यांच्या प्राणाची तुम्हाला इतकी किंमत असती तर उपोषण काळात त्यांच्या मागण्यां संदर्भात सरकारने काही भूमिका घेतली असती, त्यांच्यावर दडपशाही केली नसती अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच ठाकरेंचा राम मंदिर लुटी विरोधात एल्गार असल्याने त्या कार्यक्रमावरचे लक्ष सुटाव म्हणून सोनम वांगचुक यांना दडपशाही मार्गाने अटक करण्यात रुग्णालयात नेण्यात आले असं देखील ते म्हणाले.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, आपण जो शब्द वापरला आहे दडपण्याचा प्रयत्न केला ही दडपशाही आहे ज्या प्रश्नासाठी सोनम वांगचुक यांनी 21 दिवस उपोषण केलं त्या प्रश्नाचा निकाल लावला नाही, धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनामासाठी त्यांचा उपोषण होतं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला नाही. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्राणाची कुर्बानी देण्यास तयार असणाऱ्या सोनम वांगचुक यांना मध्यरात्री पोलिसांनी जोर जबरदस्तीने उचलून रुग्णालयात दाखल केलं, हा देश किती हुकूमशाही मार्गाने चालला आहे.
सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या प्राणाची तुम्हाला इतकी किंमत असती तर उपोषण काळात त्यांच्या मागण्यां संदर्भात सरकारने काही भूमिका घेतली असती, त्यांच्यावर दडपशाही केली नसती. त्यांच्यावर दडपशाही करण्याचा दुसरं कारण असं आहे आमचा नागपुरात जे आज हिंदुत्वाची धडक आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राम मंदिर लुटी विरोधात एल्गार आहे त्या कार्यक्रमावरचे लक्ष सुटाव म्हणून सुद्धा सोनम वांगचुक यांना काल रात्री दडपशाही मार्गाने अटक करून रुग्णालयात नेलं हे दोन कारणं आहेत, तरी आता उद्धव ठाकरे निघालेले आहे बारा वाजता नागपूरला पोहोचतील आणि चार वाजता ते रामनगर राम मंदिर येथे रवाना होतील असं खासदार संजय राऊत म्हणाले.
तसेच सोनम वांगचुक उपोषणाला बसले तेव्हा सरकारने अलर्ट होऊन एक शिष्टमंडळ पाठवून त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती त्यांच्या शरीराची 21 दिवस झीज होऊ दिली ऑर्गन फेल झाले आणि आता त्या शिक्षणमंत्र्याला दूर करण्याऐवजी त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे असं देखील यावेळी संजय राऊत म्हणाले.
मोठी बातमी ! अभिजित दिपके यांच्यावर शाईफेक
विलीनीकरणाची गोष्ट दोन वर्षापासून सुरू – संजय राऊत
तर यावेळी संजय राऊत यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर देखील भाष्य केले आहे. यावेळी राऊत म्हणाले की, दोन राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची गोष्ट दोन वर्षापासून सुरू आहे मात्र ते नाकारत आहेत.