तुम्हाला IAS व्हायचयं? UPSC टॉपर्सच्या 6 सवयी ठरतात महामंत्र; फॉलो करणाऱ्यास यश नक्की!
UPSC toppers च्या अशा कोणत्या सवय आहेत? ज्या केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर काही तर तुम्हाला यश मिळवून देऊ शकतात चला तर जाणून घेऊया
You want to become an IAS? 6 habits of UPSC toppers are a mantra Success for those who follow : दरवर्षी केंद्रीय लोकसभा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा आयोजन केले जाते त्यामध्ये लाखो संख्येने उमेदवार सहभागी होतात मात्र काही हजार हजारच फक्त मिळू शकतात यूपीएससीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे त्यामध्ये एकूण 958 ठरले आहेत. मात्र त्यांच्या जवळच्या मागील रहस्य नेमकं काय त्यांच्या कोणत्या सवय आहेत ज्या त्यांना या यशाला कळस नाही घालण्यासाठी महत्त्वाचे ठरल्या. त्यामुळे केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर काही अशा छोट्या-छोट्या सवयी, शिस्त तुम्हाला यश मिळवून देऊ शकते चला तर जाणून घेऊया यूपीएससी टॉपर्सच्या अशा कोणत्या सवय आहेत?
UPSC टॉपर्सच्या 6 सवयी ठरतात महामंत्र
जर तुम्ही भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच आयएएसची तयारी करत आहात तर UPSC टॉपर्सच्या काही सवयी तुम्ही अवलंबू शकता. ज्याप्रमाणे युपीएससीच्या परिक्षेच्या निकालामध्ये एक-एक मार्क महत्त्वाचा असतो. त्याप्रमाणे तुमच्या तयारीमध्ये या सवयी देखील अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. ज्यामध्ये योग्य स्ट्रॅटेजी, टिप्स आणि प्लॅनिंग तुम्हाला नक्की यश मिळून देईल.
दररोज अभ्यास करा
जर तुम्ही युपीएससीची तयारी करत असाल तर कशा प्रकारे हा अभ्यास करता हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. त्यासाठई तुम्ही एक सवय निश्चित करा की, दररोज अभ्यास करणे आणि प्रत्येक विषयाला योग्य वेळ देणे. त्यासाठी एक वेळापत्रक तयार करा.
सामान्य ज्ञान आणि करंट अफेयर्स वर लक्ष द्या
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना केवळ पुस्तकांचा अभ्यास करणे पुरेसं नसतं त्यासाठी जनरल नॉलेज भरपूर असणे आणि करंट अफेयर्सवर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचं असतं. देश आणि जगभरातील बातम्यांचा चांगली माहिती ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी वृत्तपत्र आणि विविध प्रकारचे करंट अफेयर्सवर लक्ष ठेवणे गरजेचे असते.
टाईम मॅनेजमेंट
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना टाईम मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाचे असते. जेणेकरून योग्य वेळेचा योग्य वापर झाल्याने अभ्यासानंतर सरावासाठी योग्य वेळ काढणे गरजेचे असते. त्या सोबतच आराम आणि मनोरंजनाला देखील वेळ देणे गरजेचे असते. त्या हिशोबाने टाईम मॅनेजमेंट करा.
वारंवार सराव
अभ्यास करताना वारंवार सराव करण्याची सवय कधीही सोडू नका. वारंवार सरावाच्या सवयीने यशाचा मार्ग सोपा होतो. जे-जे काही वाचलंय त्याचा पुन्हा-पुन्हा सराव करा.
मॉक टेस्ट आणि आत्मपरीक्षण
स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासह सरावानंतर तुम्ही मॉक टेस्ट करणे देखील अत्यंत गरजेचे आहे. ज्यामध्ये तुम्हाला तुमची तयारी किती झाली आहे? हे स्पष्ट दिसतं वारंवार प्रश्नपत्रिका सोडवत राहिल्यास मॉक टेस्ट देत राहिल्यास तुम्हाला तुमच्यातील कमतरता लक्षात येतात. त्यानुसार पुन्हा एकदा तुमचा अभ्यास रीस्ट्रक्चर करता येतो.
चांगला संवाद साधणे
अनेक यु पी एस सी टॉपर त्यांच्या अनुभवानुसार सांगतात की, त्यांच्या सवयींपैकी त्यांच्या यशामध्ये महत्त्वाची ठरलेली एक सवय म्हणजे चांगला संवाद यातून देखील परिक्षेच्या तयारीमध्ये मदत होते. ज्यामध्ये चर्चा हा महत्त्वाचा भाग असल्याने तुम्ही तुमचे विचार मांडण्यास शिकता, भाषा प्रभुत्व येत, विचारांची देवाण-घेवाण केल्याने ज्ञानामध्ये भर पडते. याचा फायदा तुम्हाला मुलाखतीमध्ये होऊ शकतो.
