मतदारांची नावं वगळल्याचा हिशेब द्यावाच लागेल; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांना इशारा

Rahul Gandhi Gyanesh Kumar : मतदारयादीतील नावं वगळण्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी मुख्य निवडणूक आयुक्तांना थेट लक्ष्य केल आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 10 31T215935.654

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार () यांना या पदावर काम करू देणार नाही, असा इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिला. भाजपने आमचे खुलासे आणि आरोप समोर आल्यानंतरही ज्ञानेश कुमार यांना पदावर कायम ठेवण्याचा आग्रह धरला, तर त्यामागचा हेतू आम्ही ओळखू, असे ते म्हणाले. निवडणुकांमध्ये हेराफेरी सुरूच ठेवता येईल, असा भाजपचा समज असू शकतो; मात्र जनता आणि विरोधी पक्ष हे प्रकार विसरणार नाहीत किंवा माफही करणार नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

दिल्लीतील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी आयोजित प्रातिनिधिक संसदेच्या बैठकीत ते बोलत होते. या अधिवेशनाचे कामकाज 3 तास 23 मिनिटे चालले. माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी खर्गे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव मांडला. त्यांच्यावर सहा आरोप ठेवण्यात आले असून, उपस्थित खासदारांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. काँग्रेससह 19 विरोधी पक्षांचे एकूण 215 खासदार या उपक्रमात सहभागी झाले होते.

ज्ञानेश कुमार माफिया, यांच्याशी कसे निपटायचे हे आम्हाला माहिती आहे; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राऊत संतापले!

राहुल गांधी यांनी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनावरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. एसआयआर प्रक्रियेद्वारे देशातील 13 कोटी म्हणजेच सुमारे 15 टक्के मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. यातील अनेक मतदारांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतदान केले होते, असेही त्यांनी नमूद केले. मागील लोकसभा निवडणुकीतील विजयाचे अंतर केवळ 3 टक्के असल्याचा उल्लेख करत मतदारांची नावे वगळण्याचा परिणाम निवडणूक निकालांवर होऊ शकतो, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

ज्ञानेश कुमार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आपल्याला वाचवतील, असे वाटत असेल तर त्यांनी देशातील जनतेचा मूड समजून घ्यावा, असे राहुल गांधी म्हणाले. मतदारांचे हक्क हिरावून घेतल्याचे लोक कधीही विसरणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. देशाच्या आत्म्यावर हल्ला करण्यात आला असून, त्यासाठी विरोधक गप्प बसणार नाहीत, असे ते म्हणाले. संसदेत बोलण्याची संधी दिली जात नसल्याचा आरोप करत, लोकांच्या पाठिंब्यामुळेच आज विरोधकांना एकत्र येऊन आपली भूमिका मांडता येत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातील महाभियोगावर चर्चा करण्यासाठी विरोधकांना बागेत बसावे लागत आहे, कारण इतर सर्व संस्था आपल्यासाठी बंद झाल्या आहेत, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.

follow us