ब्रेकिंग-1 नोव्हेंबरला दिल्ली जाम होणार? राहुल गांधींची आंदोलनाची घोषणा!

Rahul Gandhi Protest Against Gyanesh Kumar: राहुल गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या विरोधात 1 नोव्हेंबरला आंदोलनाची घोषणा.

Rahul Gandhi Protest Against Gyanesh Kumar

Rahul Gandhi Protest Against Gyanesh Kumar: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात येत्या 1 नोव्हेंबरला आंदोलनाची घोषणा केली आहे. मतदार यादीतून मतदारांची नावे वगळणे आणि मत चोरीच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत इंडिया आघाडी हे आंदोलन करणार आहे. या आंदोलनात ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे.

Heat : जगात 80 लाख श्रीमंतांमुळे तापमान वाढतंय; 19 लाख मृत्यूचा धोका, अहवालातून धक्कादायक माहिती समोर

काय म्हणाले राहुल गांधी

राहुल गांधी म्हणाले, “हे आंदोलन रामलीला मैदानावर होणार आहे. या आंदोलनात प्रत्येकजण सहभागी होऊ शकतो. देशाचे गृहमंत्री अमित शहा आंदोलनाला येणाऱ्या लोकांना रोखण्याचा प्रयत्न करतील. तरीही तुम्ही पाहा, त्यादिवशी रामलीला मैदानावर काय घडतं. किती लोक आंदोलनाला येतात आणि किती लोकांना प्रशासन अडवतं. त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की, या देशात नेमकं काय चाललंय. लोकांच्या मनात खूप रोष आहे, कारण त्यांचे मत चोरीला गेले. मतदार यादीतून नावे वगळली गेली.”

follow us