ठाकरे आपल्या दोन लेकरांसाठी प्रमोशन करत होते; मुंबईतील विद्यार्थी मोर्चावरून सदावर्तेंची ठाकरेंवर टीका

ठाकरे हे आपल्या दोन लेकरांसाठी प्रमोशन करण्यासाठी आले आहेत असा घणाघात त्यांनी केला आहे.

News Photo   2026 07 26T165452.591

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षण (Mumbai) मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या राजीनाम्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये भव्य ‘तिरंगा रॅली’ पार पडली. या तिरंगा रॅलीला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी या संपूर्ण आंदोलनावर आणि ठाकरे बंधूंवर तीव्र शब्दांत टीका केली.

हे विद्यार्थ्यांच्या भावना जपणारं सरकार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एसटी कर्मचारी मेला, तेव्हा आपली शपथ कुठे हरपली होती? भूमिका घेण्यासाठी धैर्य लागते. महाराष्ट्रात टीईटीसारखी घटना घडली होती, ते प्रकरण आता विशेष न्यायालयाकडे गेले आहे. अमित ठाकरे यांनी कोणतीही तक्रार दिली नाही, सरकारने स्वतः कारवाई केली आहे आणि आरोपींना ताब्यात घेतलं आहे. ठाकरे हे आपल्या दोन लेकरांसाठी प्रमोशन करण्यासाठी आले आहेत असा घणाघात त्यांनी केला आहे.

महागाईवर मौन, पेपरफुटीवर फायदे; उद्धव ठाकरे यांचा निर्मला सीतारामन यांच्यावर हल्लाबोल

त्याचबरोबर पुढं बोलताना सदावर्ते म्हणाले, ठाकरे यांनी सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिला, मग दिपकेची जात आडवी आली का? मग नंतर कळलं का सोनम वांगचुक यांची जात? ही राजकारणातील रोजबिगारी आहे. आदित्य ठाकरे यांना परत चौथीच्या बोर्डाची परीक्षा देण्यास सांगा. एखादी गोष्ट समजत नसेल तर शिकण्यात काही हरकत नाही. सर्व घरातली मुलं आली होती, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली असतील असंही ते यावेळी म्हणाले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रासह ‘कमबॅक करना पडेगा असा ‘जेन झी’ शैलीतील फलक चर्चेचा विषय ठरला. तसेच अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे आणि अभिजीत दिपके यांच्या कामाचे कौतुक करणारा ‘दोन वाघांना सलाम’ हा फलकही झळकला. याशिवाय एका चिमुकलीच्या हातातील “मोदी, तुमच्यापेक्षा जास्त डोकं माझ्याकडं आहे या मजकुराचा पोस्टर, तसंच मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या टी-शर्टवरील संदेश आणि पारंपरिक वेशात सहभागी झालेल्या कोळी बांधवांच्या बँड पथकानेही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलं.

follow us