‘सर्वात आधी गणेश मंडळांशी चर्चा करा’; डीजेबंदीवर ठाकरेंचा सरकारला सल्ला!

Uddhav Thackeray Backs on Pune DJ Ban गणेशोत्सवाचा उत्साह आणि नागरिकांची शांतता या दोन्ही गोष्टींचा समतोल साधत मार्ग काढला पाहिजे.

Uddhav Thackeray Backs on Pune DJ Ban

Uddhav Thackeray Backs on Pune DJ Ban: पुण्यात गणेशोत्सवाला मोठ्या आवाजात वाजवण्यात येणाऱ्या डीजेविरोधात पर्यावरणप्रेमी विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांच्यासह अनेक पुणेकरांनी आवाज उठवला. डीजेच्या दणदणाटामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करत गणेशोत्सवात डीजेवर बंदी (DJ Ban) घालण्याची मागणी केली आहे. या मागणीला आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही दुजोरा दिला आहे. या संपूर्ण विषयावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एक कोटीची पॉलिसी आणि तीन भावांचा गोंधळ; ‘अफरातफरी’च्या टिझरने वाढवली उत्सुकता

उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सवाचे महत्त्व अधोरेखित करताना लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या चळवळीची आठवण करून दिली. “लोकमान्य टिळकांनी सणांची चळवळ केली. चळवळींचे रूपांतर उत्सवात झाले, मात्र उत्सवांचे रूपांतर आता गोंगाटात होऊ नये. उत्सव हा जनतेच्या आनंदासाठी असावा, जनतेला त्रास देण्यासाठी नसावा,” असे ठाकरे म्हणाले.

डीजेबंदीच्या मागणीवर सरकारने चर्चा करावी

डीजेबंदीच्या मागणीबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला. सरकार चर्चा करून तोडगा काढण्याची भाषा करत असले तरी प्रत्यक्षात सरकार कोणाशी चर्चा करण्यास तयार आहे का?, असा सवाल त्यांनी केला.

‘हिंदूंनाच सगळे सल्ले का?’ नितेश राणेंचा विरोधकांवर घणाघात, मराठा आरक्षणावरही मोठं वक्तव्य

विद्यानंद बापट यांनी डीजेबंदीची मागणी केली असून त्यांच्या मागणीला अनेक नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. या मागणीसाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. “लोकांना उत्सव हवा आहे, मात्र त्यातून होणारा जाच नको,” अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली.

गणेश मंडळांशीही संवादाची गरज

डीजेच्या प्रश्नावर सर्व संबंधितांशी चर्चा करून तोडगा काढण्याची गरज असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. डीजे लावणाऱ्या गणेश मंडळांशी सर्वप्रथम चर्चा करायला हवी. गणेशोत्सवाचा उत्साह आणि नागरिकांची शांतता या दोन्ही गोष्टींचा समतोल साधत मार्ग काढला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

MPSC पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार; छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात हजारोंचा आक्रोश

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे उत्सवाचा आनंद कायम ठेवतानाच ध्वनीप्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रासही लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारने डीजेचा प्रश्न गांभीर्याने घेऊन पर्यावरणप्रेमी, नागरिक आणि गणेश मंडळांच्या प्रतिनिधींशी चर्चा करावी आणि सर्वमान्य तोडगा काढावा, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली.

follow us