प्राइम व्हिडिओ प्रेझेंट्स 2026 : प्राइम व्हिडिओने सादर केली आतापर्यंतची सर्वात मोठी भारतीय ओरिजिनल्स स्लेट
Prime Video 2026- आज ‘प्राइम व्हिडिओ प्रेझेंट्स’ कार्यक्रमात आतापर्यंतची सर्वात मोठी नवीन ओरिजिनल सीरीज आणि चित्रपटांची घोषणा केली.
Prime Video 2026 : भारतामधील प्रेक्षकांसाठी सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या Prime Video ने आज ‘प्राइम व्हिडिओ प्रेझेंट्स’ कार्यक्रमात आतापर्यंतची सर्वात मोठी नवीन ओरिजिनल सीरीज आणि चित्रपटांची घोषणा केली. या भव्य स्लेटमध्ये सुमारे 55 नवीन सीरीज आणि चित्रपटांचा समावेश आहे. भारतीय ओरिजिनल कंटेंटसोबतच Amazon MGM Studios इंडिया यांच्या थिएटरमध्ये रिलीज होणाऱ्या चित्रपटांची तसेच अनेक मोठ्या लाइसेंस्ड चित्रपटांचीही घोषणा करण्यात आली. हा बहुभाषिक कंटेंट प्रेक्षकांना स्ट्रीमिंगपासून सिनेमागृहांपर्यंत एक समृद्ध मनोरंजन अनुभव देणार आहे.
या स्लेटमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमधील विविध जॉनरमधील स्क्रिप्टेड आणि अनस्क्रिप्टेड कथा समाविष्ट आहेत. प्रमुख टायटल्समध्ये निक्खिल आडवाणी यांची ‘द रिवोल्यूशनरीज’ (भुवन बाम, रोहित सराफ, प्रतिभा रांटा, गुरफतेह पिरझादा), ‘मटका किंग’ (विजय वर्मा), ‘राख’ (अली फझल, सोनाली बेंद्रे, आमिर बशीर), ‘लुक्खे’ (रॅपर किंगचे अभिनयातील पदार्पण) आणि ‘वंश – द कलयुग वॉरियर्स’ (भारताची पहिली हिंदी सुपरहिरो स्ट्रीमिंग सीरीज) यांचा समावेश आहे.
नवीन टायटल्ससोबतच काही लोकप्रिय सीरीजचे नवीन सीझनही या लाइनअपमध्ये परत येत आहेत. यामध्ये ‘फर्जी’ सीझन 2, ‘पंचायत’ सीझन 5, ‘कॉल मी बे’ सीझन 2, ‘दुपहिया’ सीझन 2, ‘दहाड’ सीझन 2 आणि ‘द ट्रेटर्स’ सीझन 2 यांचा समावेश आहे. यावेळी प्रादेशिक कंटेंटमध्येही मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यात आला आहे ‘द ट्रेटर्स’चा तेलुगू व्हर्जन (तेजा सज्जा होस्ट म्हणून), ‘गुव्वला चेरुवु घाट’ (किरण अब्बावरम आणि थिरुवीर), तमिळ ड्रामा ‘एग्जाम’, ‘वधांधी’ सीझन 2 आणि ‘इन्स्पेक्टर ऋषी’ सीझन 2 हेही या स्लेटचा भाग आहेत.
या लाइनअपमध्ये अनेक नवीन मोठ्या सहकार्यांचाही समावेश आहे. Hrithik Roshan यांची एचआरएक्स फिल्म्स प्रथमच स्ट्रीमिंगमध्ये प्रवेश करत आहे. ‘स्टॉर्म’ आणि ‘मेस’ हे प्रोजेक्ट्स घेऊन येत आहे. तसेच Alia Bhatt यांची इटरनल सनशाइन प्रोडक्शन्स ‘डोंट बी शाय’ हा चित्रपट सादर करणार आहे. अनुभवी आणि नवोदित निर्मात्यांचा हा संगम प्रेक्षकांसाठी एक वेगळा मनोरंजन अनुभव निर्माण करणार आहे.
या स्लेटमध्ये Amazon MGM Studios कडून थिएटरमध्ये रिलीज होणाऱ्या पाच मोठ्या भारतीय चित्रपटांचीही घोषणा करण्यात आली आहे
‘रफ्तार’ (राजकुमार राव, कीर्ती सुरेश; दिग्दर्शक आदित्य निम्बाळकर)
‘वाइब’ (कुणाल खेमू, प्रीती झिंटा, स्पर्श श्रीवास्तव)
‘दिलकशी’ (दिग्दर्शक लिजो जोस पेलिसरी; संगीत ए.आर. रहमान)
‘नई नवेली’ (यामी गौतम; दिग्दर्शक बालाजी मोहन; निर्माता आनंद एल. राय)
‘कुकू की कुंडली’ (भुवन बाम, वामिका गब्बी; दिग्दर्शक शरण शर्मा)
याशिवाय विविध भारतीय भाषांतील अनेक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर Prime Video वर डिजिटल प्रीमियर म्हणून उपलब्ध होणार आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांना एक भव्य सिनेमॅटिक अनुभव मिळणार आहे. प्राइम व्हिडिओ इंडिया SVOD प्रमुख शिलांगी मुखर्जी म्हणाल्या, “ही स्लेट प्राइम व्हिडिओच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे आणि विविधतेने भरलेला कंटेंट सादर करते. 2025 मध्ये नवीन प्राइम सदस्य जोडण्यात भारत अग्रस्थानी होता आणि आमचे प्रेक्षक अनेक भाषांतील कथा मोठ्या प्रमाणावर पाहत आहेत.
प्राइम व्हिडिओ इंडिया ओरिजिनल्स प्रमुख निखिल मधोक म्हणाले, “आम्ही भारतातील अपार सर्जनशीलतेवर विश्वास ठेवतो आणि उत्कृष्ट कथा जागतिक स्तरावर पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत. ही आमची आतापर्यंतची सर्वात मोठी स्लेट आहे. आगामी टायटल्सची सविस्तर माहिती परिशिष्टामध्ये देण्यात आली आहे. टायटल्सची संपूर्ण यादी, क्रेडिट्स, पोस्टर्स आणि कार्यक्रमातील छायाचित्रे स्वतंत्रपणे पाहता येतील.