मनोज जरांगे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार?, लेट्सअप मराठीशी बोलताना केला मोठा खुलासा
Manoj Jarange Exclusive Interview : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने एकत्र येऊन महायुती (Mahayuti) विरोधात 100 टक्के मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्याचे संकेत देखील त्यांनी दिले आहे. यातच लेट्सअप मराठीला दिलेल्या स्फोटक मुलाखतीमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच विधानसभा निवडणूक लढवणार का? याबाबत देखील खुलासा केला आहे.
लेट्सअप मराठीशी (LetsUpp Marathi) बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत आम्ही आमच्यापैकीच उमेदवार देणार आहे. राजकीय पक्षातील आम्ही उमेदवार देणार नाही. तसेच विधानसभा निवडणुकीत मी निवडणूक लढवणार नाही याची देखील घोषणा त्यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना केली. मी समाजासाठी लढत आहे, मी स्वार्थी नाही असं जरांगे पाटील म्हणाले.
समाजाचे कष्ट आणि योगदान मी माझ्या स्वार्थासाठी वापर करणार नाही. मी समाजाचे लेकरे मोठे करणार आणि जर मराठा, दलित आणि मुस्लिम समीकरण जुळले तर त्यांच्यासाठी सत्तेचा वापर करणार असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच निवडणूक आमचे ध्येय नाही. आम्ही जेवणासोबत जसं लोणचे असते तसं राजकारणाचा वापर करतो असेही या मुलाखतीमध्ये जरांगे पाटील म्हणाले.
ओबीसी – मराठा वाद
या मुलाखतीमध्ये बोलताना जरांगे पाटील यांनी ओबीसी – मराठा वादावर बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. यावेळी जरांगे पाटील म्हणाले, आयुष्यात देवेंद्र फडणवीस यांना एकमेकांचे जाती एकमेकांच्या अंगावर घातल्या शिवाय काही आलंच नाही. त्यांनी उभं आयुष्य तेच केलं असा गंभीर आरोप मुलाखतीमध्ये बोलताना जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर केला. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे संपूर्ण भाजप संपणार असल्याचे देखील ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांनी मागितले नाही त्यांना महामंडळ, आरक्षण देत आहे मात्र आम्ही गेल्या 14 महिन्यांपासून आरक्षणाची मागणी करत आहे मात्र आम्हाला आरक्षण मिळत नाही. आम्ही आमच्या मुलांची फीस कशी भरायची असा सवाल आता भाजपमधील मराठा विचारात आहे असेही ते म्हणाले. महायुती सरकारने मराठा समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही असेही ते म्हणाले.
आज दुधाला भाव नाही, शेतकऱ्यांना वीज नाही, ज्वारीला भाव नाही मग या सरकारने केलं काय असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. लाडक्या बहिणीला पैसे दिले मात्र दुसऱ्या वस्तूंमध्ये भाव वाढवले असेही जरांगे पाटील म्हणाले.
बारामतीकरांना भावनिक साद अन् विरोधकांवर आपल्या स्टाईलने फटकेबाजी, कन्हेरीमध्ये अजित पवारांची चर्चा
सध्या सरकारमध्ये महायुती आहे त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे आरक्षणाची मागणी करत आहोत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार नाही त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे आरक्षणाची मागणी करत नाही असं देखील या मुलाखतीमध्ये बोलताना जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. सरकारने आता 17 जाती ओबीसी आरक्षणामध्ये घातले तेव्हा त्यांनी महाविकास आघाडीकडून लिहून आणलं होत का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. जनता देवेंद्र फडणवीस पेक्षा हुशार आहे आणि यावेळी राज्यात बदल होणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.