देवेंद्र फडणवीसांकडे ‘इतक्या’ कोटींची संपत्ती; लाखोंचं सोनं, जमीन अन् ६२ लाखाचं कर्जही..

देवेंद्र फडणवीसांकडे ‘इतक्या’ कोटींची संपत्ती; लाखोंचं सोनं, जमीन अन् ६२ लाखाचं कर्जही..

Devendra Fadnavis Property : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काल महाविकास (Maharashtra Elecions 2024) आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारी याद्या जाहीर झाल्या. त्याआधी महायुतीतील भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहीर झाली होती. या पहिल्याच यादीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं नाव होतं. त्यांना भाजपने नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. काल फडणवीसांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकूण १३ कोटी २७ लाख ४७ हजार ७२८ रुपये इतकी संपत्ती आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी प्रतिज्ञापत्रात संपत्ती आणि अन्य तपशीलाची माहिती दिली आहे. या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, २०२३-२४ मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न ७९ लाख ३० हजार ४०२ रुपये इतके होते. २०२२-२३ मध्ये ९२ लाख ४८ हजार ९४ रुपये इतके त्यांचे उत्पन्न होते. सन २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वैयक्तिकपणे ४५ लाख ९४ हजार ६३४ चल व ३ कोटी ७८ लाख २९ हजार रुपयांची अचल संपत्ती होती.

पाच वर्षांत धनंजय मुंडेंची संपत्ती दुप्पट; सोने-चांदी अन् कोट्यावधींची वाहनं

त्यांच्या संपत्तीचा आकडा ४ कोटी २४ लाख २३ हजार ६३४ रुपये इतका होता. मागील पाच वर्षांच्या काळात त्यांच्या संपत्तीत १ कोटी ८० हजार २३३ रुपयांची वाढ झाली आहे. त्यांच्याकडे सध्या ५६ लाख ७ हजार ८६७ चल आणि ४ कोटी ६८ लाख ९६ हजार रुपयांची अचल संपत्ती आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या बँक खात्यात २ लाख २८ हजार ७६० रुपये आहे. तर त्यांच्या पत्नीकडे १ लाख ४३ हजार ७१७ रुपये आहेत. राष्ट्रीय बचत योजना, डाक बचत, विमा यांमध्ये २० लाख ७० हजार ६०७ रुपयांची गुंतवणूक त्यांनी केली आहे. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी शेअर्स, म्यूच्यूअल फंड यांमध्ये एकूण ५ कोटी ६२ लाख ५९ हजार ३१ रुपये खर्च केले आहेत. त्यांच्याकडे १० हजार रोख तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २३ हजार ५०० रुपये रोख रक्कम आहे. फडणवीसांनी पत्नी अमृता यांच्याकडून ६२ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची माहिती शपथपत्रात देण्यात आली आहे.

फडणवीसांकडे ३२ लाखांचं सोनं

फडणवीस यांच्याकडे ४५० ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. या सोन्याची (Gold) किंमत ३२ लाख ८५ हजार रुपये इतकी आहे. अमृता फडणवीस यांच्याकडे ६५ लाख ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकूण ४ कोटी ६८ लाख ९६ हजारांची संपत्ती आहे. यामध्ये नागपूरमधील शेत जमीन, धर्मपेठ येथील घर आणि अन्य संपत्ती आहे. अमृता फडणवीस यांच्या नावावर ९५ हजार २९ रुपयांची संपत्ती आहे.

‘इंडिया’ आघाडीच काँग्रेसची डोकेदुखी? महाराष्ट्रात फक्त 85 जागा लढण्याचा अर्थ काय..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube