बारामतीकरांना भावनिक साद अन् विरोधकांवर आपल्या स्टाईलने फटकेबाजी, कन्हेरीमध्ये अजित पवारांची चर्चा

  • Written By: Published:
बारामतीकरांना भावनिक साद अन् विरोधकांवर आपल्या स्टाईलने फटकेबाजी, कन्हेरीमध्ये अजित पवारांची चर्चा

Ajit Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (Mahayuti) उमेदवार अर्ज दाखल करत आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील बारामती (Baramati) विधानसभा मतदारसंघातून आठव्यांदा उमेदवारी अर्ज भरला आहे. यानंतर कन्हेरी येथे आयोजित एका जाहीर सभेत बोलताना अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

विरोधक लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojana) बंद होणार असा प्रचार करत आहे मात्र ही योजना बंद होणार नाही अशी कबुली या सभेत बोलताना अजित पवार यांनी दिली तसेच लोकसभेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात उमेदवार द्याला नको होता अशी कबुली देखील यावेळी दिली.

बारामती विधानसभा मतदारसंघात यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्यात लढत होणार आहे. आज अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

या सभेत बोलताना अजित पवार यांनी चूक मान्य करत म्हणाले की, माझं चुकलं, मी सुनेत्राला सुप्रियाच्या विरोधात मी उमेदवार नव्हतं द्यायला पाहिजे. इथं बसलेल्या अनेक महिलांनी लोकसभेत सुप्रियाला मतदान केलं. लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादाला मतदान, दादा म्हणजे हा दादा नाहीतर लोकांना वाटेल तो दादा असं अजित पवार म्हणाले. तसेच अनेक जणांनी मला शिरुरला उभा राहा म्हणून सांगितले मात्र त्यादिवशी बारामतीच्या लोकांनी जास्त आग्रह केला म्हणून आज मी उमेदवारी अर्ज भरला असं देखील अजित पवार म्हणाले.

‘मी मनाचा मोठेपणा दाखवला अन् चूक कबूल केली पण…’, भर सभेत अजितदादा भावूक

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, प्रत्येकांनी आपल्या आपल्या गावात काम करा दुसऱ्या गावात जाऊ नका. आपापले घर सांभाळा, मी तुम्हाला हे का सांगतोय कारण माझंच घर नीट नाही असं असेही अजित पवार म्हणाले. तसेच लोकसभेत माझ्याकडून चूक झाली मात्र आता कोणी चूक केली असं प्रश्न उपस्थित करत ते या सभेत भाविक देखील झाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube