‘मी मनाचा मोठेपणा दाखवला अन् चूक कबूल केली पण…’, भर सभेत अजितदादा भावूक
Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत बारामतीमध्ये होणार आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार (Yugendra Pawar) अशी लढत होणार आहे. त्यामुळे या वेळी बारामतीकर कोणाला साथ देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती विधानसभा मतदारसंघातून (Baramati Assembly Constituency) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांनी आठव्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यानंतर आयोजित जन सन्मान सभामध्ये बोलताना अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. ते कन्हेरी येथे बोलत होते. तसेच यावेळी बारामतीकर मोठ्या मताधिक्याने विजय करून देणार असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ते म्हणाले की, जेव्हा मी सातव्यांदा या मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तेव्हा परिस्थिती वेगळी होती आणि आता वेगळी आहे. गेल्या वेळी तुम्ही माझ्या विरोधात असणाऱ्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त केले होते. मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुले शाहू, आंबेडकर विचारांना पुढे घेऊन जात आहे मात्र काही जणांकडून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे असं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तसेच परिस्थिती पाहून जनतेसाठी काम करण्यासाठी भूमिका घ्यावी लागते असं अजित पवार म्हणाले.
आज वसुबारस आहे. राज्यात महायुती सरकारने देशी गायीला राज्य मातेचा दर्जा दिला आहे. मराठी संस्कृतीला जपण्याचं काम महायुती सरकारने केला आहे. असेही यावेळी ते म्हणाले.
याच बरोबर लोकसभा निवडणुकीत मी सुप्रियाच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतो मात्र जो काम करतो तो चुकतो, मी मनाचा मोठेपणा दाखवला आणि चूक कबूल केली पण आता चूक कोणी केली, पहिला फॉर्म मी भरणार होतो असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटेना…, ‘मोर्शी’ मध्ये मैत्रीपूर्ण लढत की अजितदादांची माघार?
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, आम्ही सगळे तात्यासाहेब पवारांची फॅमीली आणि आम्ही बिकट परिस्थितीमधूनवर आलो, आई सांगते फॉर्म भरू नका माझ्या दादाविरोधात हे जे काय चाललं आहे ते बरोबर नाही. मग त्याच्यामध्ये मोठ्या व्यक्तींनी सांगायला पाहिजे होत, फॉर्म कोणी भरायला सांगितलं तर साहेबांनी फॉर्म भरायला सांगितला, म्हणजे साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घर फोडलं का? असा सवाल उपस्थित करत या सभेत बोलताना अजित पवारांना अश्रू अनावर झाले