माझ्या चुकीची पुनरावृत्ती पवारांकडून, आता निर्णय…; अजितदादांनी दिले बारामतीच्या निकालाचे संकेत

  • Written By: Published:
माझ्या चुकीची पुनरावृत्ती पवारांकडून, आता निर्णय…; अजितदादांनी दिले बारामतीच्या निकालाचे संकेत

बारामती : लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवलं होतं. मात्र, सुनेत्रा पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवानंतर अजित पवारांनी बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवारी द्यायला नको होती असे म्हणत जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर आता अजितदादांनी आज (दि.28) पुतण्या युगेंद्र पवार याच्या उमेदवारीवर भाष्य केले आहे. (Ajit Pawar On Yugendra Pawar)

Video : चंद्रकांतदादांचं टेन्शन मिटलं; कोथरूडमधून बालवडकरांनी माघार घेत उचलला विजयाचा विडा

मी केलेली चूक त्यांनी करायला नको होती

अजित पवार बारामतीमधून विधानसभेच्या रिंगणात उतरले असून, त्यांचा थेट सामना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्याशी होणार आहे. आज या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. अजितदादांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला तर, युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत अगदी शांततेत उमेदवारी दाखल केली. अर्ज दाखल करण्यापूर्वी अजित पवार म्हणाले की, मी लोकसभेत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उभं करून चूक केली. मात्र, आता हीच चूक यंदाच्या विधानसभेत शरद पवार यांच्या पक्षाकडून करण्यात आली आहे. मी केलेली चूक त्यांनी करायला नको होती मात्र, आता त्यांनी मी केलेल्या चुकीची पुनरावृत्ती केली असून, त्यांनी ही चूक करायला नको होती. पण ती चूक आता त्यांनी केली असून, मतदान त्याबाबत योग्य तो निर्णय घेतील असे अजित पवार म्हणाले.

 

प्रत्येकाला मैदानात उतरण्याचा अधिकार 

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाला निवडणुक लढवण्याचा अधिकार आहे. माझ्या विरोधात कोणताही उमेदवार आला तो तगडा असल्याचे समजूनच माझ्यासह सर्व कार्यकर्त्यांनी आणि कुटुंबातील सदस्यांनी त्याचप्रकारे प्रचार केला आहे. त्यामुळे यंदाही बारामतीकर मला प्रचंड बहुमताने निवडणून आणतील असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube