…त्यामुळे अमित शाहांनी अजितदादांच्या अपघाताबाबत वेळ दिली नसावी; रोहित पवारांनी सांगितलं कारण
Rohit Pawar यांनी अजित पवारांचा अपघाताबाबत बुधवारी दिल्लीमध्ये अमित शहांनी त्यांना वेळ न दिल्याचं सांगितलं.
Rohit Pawar on Amit Shah Appointment for Ajit Pawar Plain crash : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर राज्यामध्ये वेगाने राजकीय घडामोडी घडल्या. त्यामध्ये एकीकडे सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना देखील वेग आलेला होता.
मुलगी बनली नागीण ? गाव हादरलं; पण पोलिसात तपासात वेगळचं गूढ आढळलं
त्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या अपघाताबाबत घातपात असण्याच्या शक्यता वर्तवणारे काही प्रश्न उपस्थित केले. त्यांनतर आज ते पुन्हा पत्रकार परिषद घेणार होते. मात्र आज ती होऊ शकली नाही. मात्र त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा अजित पवारांचा अपघात आणि राष्ट्रवादीच्या एकीकरणावर बोलले. तसेच त्यांनी बुधवारी दिल्लीमध्ये अमित शहांनी त्यांना वेळ न दिल्याचं सांगितलं.
Video : भारताला चार गुजराती चालवतात, दोघे विकतात अन् दोघे; पाकिस्तानी खेळाडूने ओकली गरळ
यावेळी बोलताना ते म्हणाले की, विलीनीकरणाबाबत प्रश्न विचारला असता रोहित पगराने मोठे विधान केलं की लवकरच विरोधी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेल्वेने करण्याबाबत पत्रकार परिषदेमध्ये लवकरच सांगेल ही पत्रकार परिषद आज होणार होती मात्र आता ही पत्रकार परिषद 16 किंवा 17 फेब्रुवारीला मी मुंबईत घेईल त्यावेळी यावर सविस्तर सांगेल.
वनजमीन हडपली अन् सरकारलाच विकली; भाजप नेता म्हात्रेविरुद्ध मनी लॉंड्रिंगचा गुन्हा
त्याचबरोबर त्यांनी यावेळी त्यांनी बुधवारी दिल्लीमध्ये अमित शहांनी त्यांना वेळ न दिल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, संसदेचं अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे गृहमंत्री आणि एव्हिएशन मंत्री हे त्यामध्ये व्यस्त असतील. कदाचित त्यामुळे त्यांनी मला वेळ दिला नसावा. मी मात्र त्यांचा जास्त वेळ देणार नाही. आम्ही मेलवरून त्यांना पत्र लिहू मेलला उत्तर येईल अशी आपेक्षा करू. तसेच पुढील महिनाभरामध्ये हा तपास पुर्ण व्हावा असं मला वाटतं. तसेच वेळ दिला नाही म्हणजे नकार दिला असा थेट अर्थ काढता येणार नाही. ते अधिवेशनात व्यस्त असतील. असं म्हणत रोहित पवारांनी माहिती दिली.
