लेकासाठी बाप मैदानात; बारामतीत लोकसभेची पुनरावृत्ती?, अजित पवारांच्या विरोधात भावाने फोडला नारळ

  • Written By: Published:
लेकासाठी बाप मैदानात; बारामतीत लोकसभेची पुनरावृत्ती?, अजित पवारांच्या विरोधात भावाने फोडला नारळ

Baramati Assembly Election 2024 : बारामती मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध त्यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार निवडणुकीच्या रणांगणात आहे. (Baramati) शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता प्रचारालाही वेग आला आहे. युगेंद्र पवार यांचे वडिल आणि अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांनी मुलासाठी प्रचारासाठी नारळ फोडलाय. लेकासाठी बाप मैदानात उतरला असून भावाविरुद्ध दंड थोडपले आहेत.

सख्खे भाऊ विरोधात

युगेंद्र पवार यांची बारामतीमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी आज बारामतीच्या काशी-विश्वेश्वर मंदिरामधून नारळ वाढवत प्रचाराला सुरुवात केली आहे. बारामती विधानसभेसाठी उद्या सोमवार रोजी यूगेंद्र पवार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करणार आहेत. परंतु, त्या आधीच श्रीनिवास पवार यांनी युगेंद्र पवारांच्या प्रचाराची सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात बारामीत पाहायला मिळणार आहेत.

बारामतीत काका-पुतण्यामध्ये लढत, युगेंद्र पवार अजितदादांना देणार टक्कर…

बारामतीमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, 25 गावांत प्यायला पाणी नाही. बेरोजगारीचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही. शिक्षणात आपण जोर दिला पाहिजे. तसंच, भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचारा प्रश्न मोठा आहे. बारामतीमध्ये वाढलेला भ्रष्टाचार, स्थानिक पातळीवरील हा भ्रष्टाचार वाढलाय तो संपवायचा आहे, असं म्हणत युगेंद्र पवारांनी उमेदवारी जाही होताच नाव न घेता अजित पवारांवर तोफ डागली आहे.

जानकरांचेही उमेदवार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत रामतीमधून अजित पवार यांच्या विरोधात संदीप चोपडेंना तर कर्जत जामखेडमधून रोहित पवार यांच्याविरोधात विकास मासाळ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube